पिंपरी येथे शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या गंजीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:52+5:302021-03-28T04:12:52+5:30
मोर्शी : तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी आसाराम पारनूजी बारखडे यांच्या शेतातील गव्हाच्या गंजीला आग लागली. यात ...

पिंपरी येथे शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या गंजीला आग
मोर्शी : तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी आसाराम पारनूजी बारखडे यांच्या शेतातील गव्हाच्या गंजीला आग लागली. यात एक ते दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास ही घटना घडली. आसाराम बारखडे यांनी दोन एकर शेतात गव्हाची लागवड केली होती. गव्हाची सवंगणी केली. गहू काढण्यासाठी एक-दोन दिवस थ्रेशर मशीन न मिळाल्याने शेतातच गव्हाची गंजी होती. शुक्रवारी दुपारी जोरदार हवा सुटल्याने वीज तारांचे घर्षण झाल्यामुळे विजेची ठिणगी गव्हाच्या गंजीवर पडल्याने आग लागली. या आगीमुळे काही वेळातच गव्हाची गंजी जळून खाक झाली. शेतातील आठ ते १० संत्राझाडेसुद्धा जळाली.