‘लगेज स्कॅनर’चा उपयोग काय ?

By Admin | Updated: June 23, 2015 00:55 IST2015-06-23T00:55:07+5:302015-06-23T00:55:07+5:30

रेल्वे स्थानकावर ‘लगेज स्कॅनर’ मशीन अधूनमधून बंद ठेवली जाते.

What is the use of 'luggage scanner'? | ‘लगेज स्कॅनर’चा उपयोग काय ?

‘लगेज स्कॅनर’चा उपयोग काय ?

बडनेरा : रेल्वे स्थानकावर ‘लगेज स्कॅनर’ मशीन अधूनमधून बंद ठेवली जाते. याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारीदेखील तैनात नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रेल्वेस्थानकाच्या नवी वस्ती परिसरातील तिकीट घराजवळ लगेज स्कॅनर मशीन बसविण्यात आली आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही स्कॅनर मशीन याठिकाणी लावण्यात आली असले तरी बहुतेक वेळा ती बंदच राहत असल्याने त्या मशीनचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. रेल्वे सुरक्षा बलाचा एक पोलीस येथे तैनात करण्यात आला आहे. मात्र, ते याठिकाणी कधीही हजर नसतात. त्यामुळे प्रवासी बिनदिक्कतपणे विनातपासणी रेल्वे स्थानकात शिरतात आणि जातातही. प्रवाशांजवळील लगेज स्कॅन करण्यासाठी हे यंत्र लावण्यात आले आहे. जेणेकरून घातपाताच्या वस्तू रेल्वे स्थानकावर येऊ नयेत किंवा रेल्वे स्थानकाच्या बाहेर जाऊ नयेत, असा यामागील उद्देश आहे. मात्र, हे मशीन बरेचदा बंद असते. याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने प्रवासी या मशिनचा उपयोग बसण्यासाठी करीत आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकाची सुरक्षा यामुळे ऐरणीवर आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या हलगर्जीपणामुळे एखादवेळी मोठा अपघातदेखील घडू शकतो. बडनेरा जंक्शन असल्याने येथून दरदिवसाला मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे लगेच स्कॅनिंग यंत्र कार्यान्वित असणे आवश्यक आहे. त्यातून रेल्वेस्थानकाला असलेला संभाव्य धोका आधीच कळू शकतो. त्यामुळे तो टाळताही येऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे जाणकारांचे मत आहे.

रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे काय ?
बडनेरा हे जंक्शन असल्याने देशभरातून प्रवासी येथे उतरतात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जातातही. सुरक्षेची कोणतीही तरतूद नसल्याने या स्थानकावरून बिनबोभाट घातक, तस्करीच्या वस्तुंची ने-आण करता येते. यातून मोठी घटनादेखील घडू शकते.

Web Title: What is the use of 'luggage scanner'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.