१६ च्या ‘जीबी’ला अर्थ काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:02 IST2016-05-14T00:02:35+5:302016-05-14T00:02:35+5:30
गुडेवार यांना संपूर्ण तीन वर्षांसाठी अमरावतीत आयुक्त म्हणून ठेवावे, असा ठराव पारित करण्यासाठी विशेष आमसभा बोलवावी,

१६ च्या ‘जीबी’ला अर्थ काय ?
गुडेवार यांना संपूर्ण तीन वर्षांसाठी अमरावतीत आयुक्त म्हणून ठेवावे, असा ठराव पारित करण्यासाठी विशेष आमसभा बोलवावी, अशी विनंती नगरसेवक प्रदीप बाजड, धीरज हिवसे यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी महापौरांकडे केली. मात्र, त्या विनंतीचा फारशा गांभीर्याने विचार झाला नाही. बदलीचे वारे वेगाने घोंगावत असताना १९ मे रोजी होणारी आमसभा ३ दिवस आधी घेऊन पदाधिकाऱ्यांनी काय सिद्ध केले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे १६ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये बाजड, हिवसे यांनी विशेष सभा बोलविण्याचा दिलेला प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३६ प्रकरण ३ प्रमाणे चंद्रकांत गुडेवार यांना ३ वर्षे पूर्ण कालावधीसाठी ठेवण्याच्या संदर्भात विशेष सर्वसाधारण सभा बोलाण्याचा तो प्रस्ताव आहे. मग १६ ची आमसभा चंद्रकांत गुडेवारांच्या समर्थनार्थ बोलविलेली विशेष आमसभा कशी? आणि १६ च्या आमसभेत सर्वसाधारण सभा बोलविण्यावर चर्चा होणार असेल तर ठराव कुठल्या आमसभेत ठेवला जाईल, हा प्रश्न अनुुत्तरीत आहे. म्हणजे सत्ताधिशांनी निवेदनकर्त्या नगरसेवकांची बोळवण केली, हे स्पष्ट आहे.