शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरमध्ये खरीप, पेरणीपूर्व मशागतींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 17:29 IST

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे.

अमरावती - रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती पाण्यात जलविहार करणार, असा शेतक-यांचा अंदाज आहे. हवामानतज्ज्ञांनीही २५ जूनपासून मान्सून व-हाडात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या शिवारात पेरणीपूर्व मशागतींना वेग आलेला आहे. यंदा ३१ लाख ६४ हजार ४१८ हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गतवर्षीचा खरीप सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पावसामुळे बाधित झाला. यंदा १२ ते १५ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली, आता तो राज्यात प्रवेशित झाल्यामुळे शेतकºयांमध्ये उत्साह संचारला असून, शेतशिवारात कामांची लगबग सुरू झालेली आहे. यंदाच्या खरिपासाठी अमरावती जिल्ह्यात ७,२८,११२ हेक्टर, बुलडाणा ६,६५,५९६, अकोला ४,८२,६२०, वाशिम ३,९९,६६९ व यवतमाळ जिल्ह्यात ८,८८,४२१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. पावसाने आणखी १० ते १५ दिवस दांडी मारल्यास मूग व उडदाचे पेरणीक्षेत्र सोयाबीन व कपाशीत रूपांतरित होणार आहे.यंदा सर्वाधिक १३,६४,८०४ हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३,७५०४६ हेक्टर क्षेत्र बुलडाणा जिल्ह्यात राहील, अकोला १,११,६१०, वाशीम २,८३,१३७, अमरावती ३,२३,३०० व यवतमाळ जिल्ह्यात २,७२,७११ हेक्टर राहणार आहे. संकरित कपाशीचे यंदा ९,६९,०५७ हेक्टर  व सुधारित कपाशीचे १७,५३१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. संकरित ज्वार १,४४,५१८ हेक्टर, संकरित बाजरा २,००८ हेक्टर, मका १९,३०३ हेक्टर, तूर ४,२९,८९८ हेक्टर, मूग १,३३,८२७, उडीद ६४,५३६ हेक्टर, भुईमूग १,६४८ हेक्टर, सूर्यफूल ६,७२९ हेक्टर, तीळ ४८७३ हेक्टर तसेच धान व इतर पिकांचे ५,५८९ हेक्टर क्षेत्र राहणार आहे.

यंदा ६,४०,४६० क्विंटल बियाण्यांची मागणी खरिपासाठी यंदा ६,४०,४६० क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. यामध्ये ३,४८५ क्विंटल संकरित ज्वार, बाजरा २ क्विंटल, मका १००, तूर १०,५११, मूग २,२६९, उडीद ३,८९०, सूर्यफूल २, तीळ १३, सोयाबीन २,७८,७३०, संकरित कापूस २,७८,७३० व सुधारित कापसाचे १३ क्विंटल बियाणे लागणार आहेत. यंदा सार्वजनिक क्षेत्रातून ३,१८,०८९ क्विंटल खासगी ३,२२,३७१ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत. महाबीजद्वारा २,९९,५८९ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

खरिपासाठी ६,७४,१४० मे.टन खतांची मागणी यंदाच्या खरीप हंगामासाठी ६,७४,१४० मे.टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. यामध्ये युरिया २,१४,५०९ मे.टन, डीएपी १,०७,५३७, एमओपी ३९,४७१, एसएसपी १,०३,७९३ व कॉप्लेक्समध्ये २,०८,८२९ मे.टन खतांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ५,५२,४७५ मे.टन खतांचे आवंटन आहे. यामध्ये युरिया १,८६,००० मे.टन, डीएपी ८०४१०, एमओपी ३४,४३५, एसएसपी ९१,२१० व कॉप्लेक्सेसमध्ये १,६०२४० मे.टन खतांचा समावेश आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती