शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पश्चिम विदर्भात ४५२ टँकर, २७३६ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:09 IST

सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली टँकर अन् विहीर अधिग्रहणाची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४०९ गावांमध्ये ४५२ टँकरद्वारा पाणीपुरवठा होत आहे. तात्पुरता उपाय म्हणून २,७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितले.अमरावती विभागात पाच वर्षांचा आढावा घेतला असता, २०१४ मध्ये सरासरीच्या ८३ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७१.५ टक्के, २०१६ मध्ये १०९.०९ टक्के, २०१७ मध्ये ७६ टक्के, तर २०१८ मध्ये ८५.०४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे पश्चिम विदर्भात सलग दुष्काळ, नापिकी अन् पाणीटंचाईचे दुष्टचक्र सुरू आहे. जलयुक्त शिवारची ६० हजारांवर कामे या चार वर्षांत झाली. मात्र, प्रशासनात नियोजनाचा दुष्काळ असल्याने यंदा पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. शासनाच्याच आरखड्यानुसार यंदा वºहाडातील ३,७३३ गावांत भीषण पाणीटंचाई आहे.पाणीटंचाई निवारणार्थ यंदा अमरावती जिल्ह्यात १९८१, अकोला ५६९, यवतमाळ ७५५, बुलडाणा २१६७ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजना प्रस्तावित केल्यात यापैकी ३४९९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. त्यातुलनेत ४९५ उपाययोजना प्रगतीत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार ३००४ उपाययोजना पूर्ण झालेल्या आहेत. पूर्ण झालेल्या उपाययोजनांसाठी ५३.७३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी ७.३७ कोटी, नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी २.१९ कोटी, तात्पुरत्या पूरक नळयोजनांसाठी ३.०२ कोटी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २८.६५ कोटी, तर खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी १२.४९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.४५२ टँकरचा आजपर्यंतचा विक्रमपाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून पश्चिम विदर्भात ४५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. हा आतापर्यंतचा रेकार्ड असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २६४ टँकर सध्या सुरू आहे. अमरावती ५४, अकोला ३६ यवतमाळ ४३ व वाशिम जिल्ह्यात ५५ टँकर सुरू आहे. यापूवी २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ११३ टँकर व १०७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते, तर २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ३४४ टँकर व १८४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.२७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून विभागात सद्यस्थितीत २७३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. हीदेखील विभागातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये सर्वाधिक ९८७ खासगी विहिरींचे अधिग्रहण बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. अमरावती ५६५, अकोला २७०, यवतमाळ ६६४ व वाशिम जिल्ह्यात २५० विहिरींचा समावेश आहे. विशेष म्हणजे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने अधिग्रहित केलेल्या विहिरींनादेखील कोरड लागल्याने स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई