सुटीच्या दिवशी तहसीलमध्ये गेली अन् परतलीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:50+5:302021-09-16T04:16:50+5:30

पान १ अमरावती : मुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनाच्या गुन्हेविषयक अहवालातून स्पष्ट ...

Went to tehsil on holiday and never returned! | सुटीच्या दिवशी तहसीलमध्ये गेली अन् परतलीच नाही!

सुटीच्या दिवशी तहसीलमध्ये गेली अन् परतलीच नाही!

Next

पान १

अमरावती : मुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनाच्या गुन्हेविषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. सामाजिक स्तरावर असुरक्षिततेचे वातावरण पसरले असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे अशा गुन्ह्यांवर प्रतिबंधक उपाययोजना करून कठोर कारवाईची गरज आहे. अशीच एक घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे. सुटीच्या दिवशी तहसीलमध्ये गेली, ती अल्पवयीन मुलगी परतलीच नसल्याच्या त्या घटनेप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता १७ वर्षीय मुलगी एका कनिष्ठ महाविद्यालयातून टीसी काढून आणते, भातकुली तहसीलमधून अपडेट केलेले आधार कार्ड घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतर कुटुंबीयांकडून शोधाशोध करण्यात आली. संबंधित कनिष्ठ महाविद्यालय व तहसीलमध्ये जाऊन विचारणा करण्यात आली, तर त्या दिवशी महालक्ष्मी पूजनाची ‘कलेक्टर डिक्लेअर्ड’ सुटी असल्याचे लक्षात आले. तिचा आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईक, मैत्रिणींकडे शोध घेण्यात आला. मात्र, ती मिळून आली नाही. त्यामुळे तिला अज्ञाताने पळवून नेले, अशी तक्रार १३ सप्टेंबर रोजी रात्री १०.४६ च्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक नरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.

///////////////

हे प्रकार वाढले

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणे, असहाय महिलांना आपल्या जाळ्य़ात ओढणे, वाटेत थांबवून रस्ता विचारणे, अंगावर काही तरी पडलेय, वयोवृद्ध महिलांना पुढे अपघात झाला आहे, पुढे पोलीस तपासणी करीत आहेत, अशा अनेक आमिषांना बळी पडून आज कित्येक वर्षे लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. टीव्ही चॅनल किंवा वर्तमानपत्रात या बातम्या आपण रोजच वाचत असतो, पाहत असतो; परंतु यातून आपला समाज कोणताच बोध घेत नाही. अलीकडे अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

Web Title: Went to tehsil on holiday and never returned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.