परतवाड्यात निघाली मारबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:47+5:302021-09-08T04:17:47+5:30
ईड- पीड, रोगराई, डेंगू, कोरोना घेऊन जा गे मारबत फोटो कॅप्शन शहरातून निघालेल्या मारबतीत सहभागी नागरिक नरेंद्र जावरे - ...

परतवाड्यात निघाली मारबत
ईड- पीड, रोगराई, डेंगू, कोरोना घेऊन जा गे मारबत
फोटो कॅप्शन शहरातून निघालेल्या मारबतीत सहभागी नागरिक
नरेंद्र जावरे - परतवाडा : शहरातील भयानक चौक येथील युवक मंडळ काही वर्षापासून तान्हा पोळ्याच्या दिवशी शहरातून मारबत काढतात. त्याचप्रमाणे मंगळवारी रोगराई, डेंगू घेऊन जा गे मारबत, असे म्हणत ही मारबत काढण्यात आली.
देशात फक्त सर्वाधिक प्रमाणात मारबत काढण्याचा प्रताप नागपूर शहरात आहे. कालांतराने लहान-मोठ्या शहरातसुद्धा अनिष्ठ प्रथाविरुद्ध मारबत काढल्या जातात. मारबत हे बड्या मिरवणुकीचे आकर्षणाचे केंद्र ठरले. परतवाडा शहरात उत्तम साखरे यांच्या नेतृत्वात युवक दरवर्षी मारबत काढतात. ललित सहारे, गौरव शहारे, भरत जनबंधू, सुरेश जनबंधू, सागर साखरे, सुशील जनबंधू, संतोष सहारे, छोटू डोंगरे, अनिकेत मोहतुरे आदी युवकांनी शहरातील भयानक चौक, टिळक चौक, पोलीस स्टेशन, दुराणी चौकापासून मार्गक्रमण करीत गोंडविहीर तलावावर या मारबतीचे विसर्जन केले.