सुनील देशमुख यांचे अमरावतीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:09 IST2021-06-23T04:09:37+5:302021-06-23T04:09:37+5:30

सुनील देशमुख यांचे अमरावतीत स्वागत फोटो - काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दिवसभर निवासस्थानी वर्दळ अमरावती : माजी राज्यमंत्री डॉ. सुनील ...

Welcome to Sunil Deshmukh in Amravati | सुनील देशमुख यांचे अमरावतीत स्वागत

सुनील देशमुख यांचे अमरावतीत स्वागत

सुनील देशमुख यांचे अमरावतीत स्वागत

फोटो -

काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दिवसभर निवासस्थानी वर्दळ

अमरावती : माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये पुन:प्रवेश केल्यानंतर ते सोमवारी अमरावती शहरात दाखल झाले. यानंतर दिवसभर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा रुक्मिणीनगर येथील निवासस्थानी स्वागतासाठी गराडा होता. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक धुरीणांनी त्यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

डॉ. सुनील देशमुख यांनी शनिवारी मुंबईच्या टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांचेसह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अविनाश पांडे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर प्रथमच सोमवारी त्यांचे अमरावतीमध्ये आगमन झाले. निवासस्थानी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक शोभा शिंदे, सलीम बेग, नगरसेवक अनिल माधोगडिया, सादीक फिरोज शाह, संजय वाघ, राजू भेले, सुरेश रतावा, अभिनंदन पेंढारी, प्रशांत महल्लेे, हाजी रफीक, गजानन राजगुरे, अरुण रामेकर, सलीम मीरावाले, भैय्यासाहेब निचत, रमेश राजोटे, जयश्री वानखडे, राजा बागडे, राजेश चव्हाण, पुरुषोत्तम मुंदडा, राजा देशमुख, मुकेश छांगाणी, ॲड. निया खान, अब्दुल रफीक, शमसुन्नीसा बाजी, अस्मा परवीन, करीमा बाजी................, नीलेश गुले, संकेत कुलट, सोहन कुरील, यासीर भारती, जावेद साबीर, असलम सलाट..............., आकाश तायडे, आशिष तायडे, दीपक लोखंडे, अभिषेक गावंडे, सुरेश कनोजिया, अर्जुन सूर्यवंशी, अरुण बनारसे, अविनाश पारडे, राजा चौधरी, गोपाल धर्माळे, हमीद शाह आदींनी त्यांची भेट घेतली.

Web Title: Welcome to Sunil Deshmukh in Amravati