वेलकम अर्थमंत्री साहेब, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:33 IST2019-01-21T23:32:51+5:302019-01-21T23:33:07+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील फासेपारधी, अनाथ व निराधार विद्यार्थ्यांनी सोमवारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या मांडली. ‘वेलकम अर्थमंत्री साहेब, पाण्याचा प्रश्न सोडवा’ असे दोन्ही हात उंचावून त्यांच्या पुढ्यात ही महत्त्वाची मागणी मांडली.

वेलकम अर्थमंत्री साहेब, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील फासेपारधी, अनाथ व निराधार विद्यार्थ्यांनी सोमवारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या मांडली. ‘वेलकम अर्थमंत्री साहेब, पाण्याचा प्रश्न सोडवा’ असे दोन्ही हात उंचावून त्यांच्या पुढ्यात ही महत्त्वाची मागणी मांडली.
विभागीय आयुक्त कार्यालयात ना. मुनगंटीवार हे नियोजन बैठकीसाठी आले असता, त्यांना प्रश्नचिन्ह शाळेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी आश्रमशाळेतील पाणीप्रश्नाबाबत अवगत केले. ना. मुनगंटीवार येताच विद्यार्थ्यांनी हात उंचावून टाळ्या वाजविल्या.
आश्रमशाळेत लोकवर्गणीतून हातपंप केला. मात्र, तो कोरडा गेल्याने नजीकच्या कनी मिर्झापूर येथील महसूलच्या जागेवर हातपंपातून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. १८० फूट बोअर केले असून, एक इंच पाणी लागले. आश्रमशाळेची मागणी अधिक असल्याने हातपंपाचे पुन्हा खोलीकरण आवश्यक आहे. परंतु, तेथील संरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी मनाई केली आहे. उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने हातपंप खोलीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी भोसले यांनी केली. निवेदनाच्या अनुषंगाने ना. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
आश्रमशाळेच्या आवारात पाण्यासाठी ८ ते १० वेळा बोअर करण्यात आले. मात्र, पाणी कुठेच लागले नाही. त्यामुळे लोकवर्गणीतून हातपंप घेतला. पाण्याची समस्या वाढीस लागत असल्याने कनी मिर्झापूर येथील हातपंपाचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. शाळेत ४२१ विद्यार्थी आहेत.
- मतीन भोसले, अध्यक्ष, प्रश्न चिन्ह आश्रमशाळा