बबलू शेखावत यांचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:12 IST2020-12-25T04:12:27+5:302020-12-25T04:12:27+5:30

अमरावती : शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा शहरात परतलेल्या बबलू शेखावत यांचे गुरुवारी सकाळी राजकमल चौकात ढोलतासे व ...

Welcome to Bablu Shekhawat | बबलू शेखावत यांचे जल्लोषात स्वागत

बबलू शेखावत यांचे जल्लोषात स्वागत

अमरावती : शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा शहरात परतलेल्या बबलू शेखावत यांचे गुरुवारी सकाळी राजकमल चौकात ढोलतासे व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विवध राजकीत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा शेखावत यांचे स्वागत केले. माजी महापौर विलास इंगोले यांनी शेखावत यांना उत्स्फूर्तपणे खांद्यावर घेतले. यावेळी घोषणांनी चौक दणाणून गेला. हरिभाऊ मोहोड, किशोर बोरकर, महापालिकेतील नगरसेवक बंडू हिवसे, सुनीता भेले, शोभा शिंदे, वंदना कंगाले, सलीम बेग, फिरोज शाह, सादीक साह, हमीसद धाह, अपरोज खान, नियाज खान, राजू बागडे, जितेंद्र वघ, संजय वघ, सुरेश रतावा, अनिल नावंदर, सागर देशमुख, योगेश गावंडे, गजानन राजगुरे, देवयानी कुर्वे, अर्चना सवाई, राजू भेले, सागर कलाने व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Welcome to Bablu Shekhawat