मोर्शीत भरला आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST2021-05-27T04:14:07+5:302021-05-27T04:14:07+5:30
प्रशासनाने लावले हुसकावून, सोशल डिस्टनिंग नाहीच मोर्शी : तालुक्यातील सर्वात मोठ्या मोर्शी शहरातील मंगळवार बाजाराला मोठी गर्दी झाली होती. ...

मोर्शीत भरला आठवडी बाजार
प्रशासनाने लावले हुसकावून, सोशल डिस्टनिंग नाहीच
मोर्शी : तालुक्यातील सर्वात मोठ्या मोर्शी शहरातील मंगळवार बाजाराला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रशासनाने येथील विक्रेत्यांना हुडकून लावले. मात्र, त्यांनी राम मंदिर चौकात पुन्हा दुकाने थाटली.
आठवडी बाजार म्हणून ओळख असलेल्या मंगळवार बाजारात तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी येतात. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती व प्रशासनाने उपाययोजना राबविण्यासाठी दिलेले आदेश डावलून व्यावसायिक व ग्राहकांनी येथे गर्दी केली होती. त्यामुळे पोलीस व नगर परिषद प्रशासनाने व्यापाऱ्यांना हुसकावून लावले. या बाजारातून येऊन भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी स्थानिक राम मंदिर चौक येथे दुकाने थाटली. तेथील गर्दीदेखील आटोक्याबाहेर होती. राम मंदिर चौकात दररोजच भाजीपाला विक्रेते आपली दुकाने थाटत असल्याने हा परिसर ‘कोरोना हॉटस्पॉट’ होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.