शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

आठवड्यात १५ कोटी वसुलीचे दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:48 IST

आर्थिक वर्षे संपायला उणे-पुरे आठवडा शिल्लक असताना करवसुली अवघी ६८ टक्क्यांवर स्थिरावली. त्यामुळे प्रशासनाने आता मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मोबाईल टॉवरधारकांसारखे बडे जप्तीच्या कारवाईनंतरही महापालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे३२ टक्के थकबाकी : यंत्रणा कामाला, समन्वयक अधिकाऱ्यांकडून आढावा

आॅनलाईन लोकमतअमरावती : आर्थिक वर्षे संपायला उणे-पुरे आठवडा शिल्लक असताना करवसुली अवघी ६८ टक्क्यांवर स्थिरावली. त्यामुळे प्रशासनाने आता मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मोबाईल टॉवरधारकांसारखे बडे जप्तीच्या कारवाईनंतरही महापालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे.मागील पंधरा दिवसांत महापालिकेने १५ पेक्षा अधिक मोबाईल टॉवर सील केलेत, पालिकेने कारवाई केली तथापि त्यांचेकडून कर वसूली होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. उर्वरित आठवड्यात तब्बल १५ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान कर यंत्रणेसमक्ष उभे ठाकले आहे. मात्र, दिवसाकाठी होणारी सरासरी २५ लाख रुपयांची वसुली पाहता १५ कोटी वसूल करणे महापालिकेसाठी दिवास्वप्न ठरण्याचे संकेत आहेत.महापालिका आयुक्त हेमंत पवार हे वैद्यकीय रजेवर गेल्याचा परिणामही वसुलीवर झाला आहे.४७.२२ कोटी रुपये एकूण मागणीच्या तुलनेत २३ मार्चपर्यंत मालमत्ता कराच्या रुपात ३२.१९ कोटी रुपये महसूल गोळा झाला. सहायक आयुक्त व सहायक क्षेत्रीय अधिकाºयांसह कर लिपिकांच्या साथीला आयुक्तांनी समन्वयक अधिकारी दिल्याने त्याचा सुपरिणाम करवसुलीवर झाल्याचेही वास्तव आहे. सरासरी २५ लाख रुपये रोजची वसुली झाल्यास या आठवड्यात १.७५ कोटी रुपयांची भर पडणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास ३१ मार्चअखेरची वसुली ३४ कोटींच्या घरात असेल.गतवर्षी नोटबंदीचा फायदा होऊनही करवसुली ३०.३४ कोटी रुपयांवर स्थिरावली होती. गतवर्षीच्या तुलनेत मार्चच्या तिसºया आठवड्यातच सरासरी २ कोटी रुपयांची वाढ नोंदविली गेली. त्यामुळे हुरुप वाढलेली कर यंत्रणा नव्या जोमाने कामाला लागली आहे.पाचही झोनमधील थकीत मालमत्ता जप्त करून त्यांची लिलाव प्रक्रिया आरंभली आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरल्यास उर्वरित मालमत्तांचाही लिलाव करण्याची कठोर भूमिका प्रशासनाने घेतली आहे. शतप्रतिशत टॅक्स वसुलीसाठी ‘घर ते घर’ (हाऊस टू हाऊस) मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीचा आकडा वाढण्याऐवजी १५ कोटींवर गेलेला थकबाकीचा डोंगर सर करताना अधिकारी-कर्मचाºयांची दमछाक होत आहे. त्यामुळे मार्चअखेरीस मालमत्ता करवसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वरिष्ठ अधिकाºयांना मोठी कसरत करावी लागणार आहे. मार्चअखेर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती सुरू केली आहे. जप्त मालमत्तांवर पालिकेचे नाव लावून त्याचा लिलाव केला जात आहे.थकबाकीबाबत बहुतांश नगरसेवक अनभिज्ञज्या प्रभागातील करवसुली माघारली, त्या प्रभागाचे नेतृत्व करणाºया नगरसेवकांचे सहकार्य आयुक्तांनी मागितले होते. नगरसेवकांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये मालमत्ता कर भरण्यासंदर्भात जनजागृती करावी, सहायक आयुक्त वा कर यंत्रणेतील अन्य कर्मचाºयांनी हाक दिल्यास त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार यांनी केले होते. मात्र, दोन सहायक आयुक्तांचा अपवाद वगळता अन्य तिघांनी त्यासाठी नगरसेवकांना फारसे महत्त्व न दिल्याची ओरड आहे.