शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लग्न सोहळा ठरला कोरोना प्रसाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 5:00 AM

घाटलाडकी येथील युवक ३ जून रोजी आपल्या मामेबहिणीच्या लग्नात चांदूर बाजार शहरातील ताजनगर येथे आला होता. यात सदर युवकाचा मामाशी संपर्क झाल्याने १२ जून रोजी त्या ५५ वर्षे व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेले ४४ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. यातील रविवारी सकाळी १३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देचांदृूरबाजार ‘लॉकडाऊन’ : ४४ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : घाटलाडकी येथील तरुणापाठोपाठ चांदूर बाजार येथील त्याचा मामा, मावशी व मामेबहीण कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. चांदूर बाजारमध्ये झालेल्या एका लग्न सोहळ्यातून तो संसर्ग झाला असण्याची शक्यता महसूल व आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.घाटलाडकी येथील युवक ३ जून रोजी आपल्या मामेबहिणीच्या लग्नात चांदूर बाजार शहरातील ताजनगर येथे आला होता. यात सदर युवकाचा मामाशी संपर्क झाल्याने १२ जून रोजी त्या ५५ वर्षे व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेले ४४ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. यातील रविवारी सकाळी १३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये ताजनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाची मुलगी व घाटलाडकी येथील एक महिला या दोन्ही महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील उर्वरित ३१ व्यक्तींचे अहवाल अद्यापही प्रलंबित असून, रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शहरातील रामभट्ट प्लॉट परिसरातील महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त होताच तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी प्रफुल भोरगडे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी हा परिसर सील केला.नगराध्यक्ष रवींद्र पवार व तहसीलदार अभिजित जगताप यांनी परिसरातील नागरिकांना घरातच राहून प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. तीन दिवसांपासून शहराची बाजारपेठ बंद असून, रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन बाजारपेठ आणखी काही दिवस बंद ठेवली जाणार असल्याचा निर्णय प्रशासन घेत असल्याचे कळते.ताजनगर व रामभट्ट प्लॉट परिसरात लग्नासाठी आता नवीन परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या