मृत्यूच्या खाईत कोसळूनही आम्ही वाचलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:15 IST2021-01-19T04:15:46+5:302021-01-19T04:15:46+5:30

अमरावती : एसटीत बसून निवांत प्रवास करीत होतो. अवघ्या १५ मिनिटांत घर गाठणार तेवढ्यात अचानक खडकण आवाज आला. क्षणभर ...

We survived the fall into the abyss of death | मृत्यूच्या खाईत कोसळूनही आम्ही वाचलो

मृत्यूच्या खाईत कोसळूनही आम्ही वाचलो

अमरावती : एसटीत बसून निवांत प्रवास करीत होतो. अवघ्या १५ मिनिटांत घर गाठणार तेवढ्यात अचानक खडकण आवाज आला. क्षणभर दचकलो. सारेच प्रवासी आपापल्या आसनावरून उभे होऊन काय झाले म्हणून घाबरून पुढे पाहू लागले. तत्क्षण बसचा खडखड आवाज आला नि बस ५० फूट खोल नदीत कोसळली. चालकाच्या प्रसंगावधानाने ती सरळ पडल्याने प्रवाशांना प्राण वाचविण्यात यश आले. तो क्षण यम घेण्यास आल्याचाच अनुभव घेतल्याची प्रतिक्रिया प्रवासी विजय वाघमारे यांनी दिली.

वरूड तालुक्यातील जरूड येथील विजय पुंडलिक वाघमारे यांचा मुलगा वागपूर येथील एका इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय करतो. त्याला तीन दिवसांची सुटी काढून घरी आणण्याकरिता काटोल नागपूर-वरूड बस क्रमांक एमएच ४० एक्यू ६०६५ मध्ये सायंकाळी ४.४५ वाजता वाडी (नागपूर) हून मुलासह बसलो. जरूड येथे ३ तासांत बस पोहोचणार होती. घराकडे येताना ढगा गावाजवळील पुलावरून जात असलेला ट्रॅक्टर आडवा आल्याने बसचालकाने त्याला धडक दिली. तेवढ्यात सर्व प्रवासी सावधान होऊन आपापले आसन पकडून उभे झाले. बस पुलाचे कठडे तुडवीत थेट ५० फूट खोल नदीत कोसळळी. यात ५० प्रवासी होते; मात्र बसचालकाने प्रसंगावधान राखत बस सरळ खाली उतरविल्याने प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले. काहींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच ढगा येथील नागरिक मदतीला धावले. सर्व प्रवाशांना बाहेर काढून वरूडला पोहोचविले. तेथे आमदार देवेंद्र भुयार दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून प्रवाशांना गरजेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविले. विजय वाघमारे व त्यांचा मुलगा आनंद यांना रात्री इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. त्वरित डॉक्टरांनी भरती करून घेत उपचाराला सुरुवात केली; परंतु गाव दूर असल्याने पुढील उपचार वरूड येथील रुग्णालयात घेण्याचे मत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

Web Title: We survived the fall into the abyss of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.