शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शिष्यवृत्ती देतो, तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घ्या; शासनाची अभिनव योजना

By गणेश वासनिक | Updated: October 14, 2023 17:31 IST

राज्यात अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील ११२ विद्यार्थ्यांची निवड; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पुढाकार

अमरावती : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत सन २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातून ११२ विद्यार्थ्यांची नामांकित विद्यापीठ, शैक्षणिक संस्थेत निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी पदव्युत्तर, पदवी आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी निवडले गेले आहे. आम्ही शिष्यवृत्ती देतो, तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घ्या, अशी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाची अभिनव योजना आहे. शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी, निकषांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

शिष्यवृत्तीसाठी लागणारी रक्कम समाज कल्याण आयुक्तांना देण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. परदेशातशिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण संपल्यानंतर देशाचे सेवा करण्यासाठी हमीपत्र द्यावे लागते. निवड झालेल्या शैक्षणिक संस्थेतच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. परस्पर बदल केल्यास शिष्यवृत्तीची रक्कम परत घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता व ईतर अनुषंगीक खर्च शिष्यवृत्तीच्या रक्कमेत समाविष्ट करण्यात आला आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी हे यूके, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूयार्क, फिलीपाईन्स या देशात उच्च शिक्षण घेणार आहेत.

अशी झाली विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्ती निवड

पदव्युत्तर पदवी कला- २, पदव्युत्तर पदवी वाणिज्य- २,पदव्युत्तर पदवी विज्ञान- २, पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी- २४, पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन - ११, पदव्युत्तर पदवी विधी - ५, पीएचडी कला - ३, पीएचडी विज्ञान - ५, पीएचडी अभियांत्रिकी - ५

आंतरपरिवर्तनाने निवडपदव्युत्तर पदवी पीजी - १४, पदव्युत्तर पदवी पीएचडी - ०१

सर्वसाधारण प्रतीक्षा यादीपदव्युत्तर पदवी पीजी -३८

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना ही गरीब, सामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक परिवर्तनाची नांदी ठरत आहे. त्यांच्या आई-वडिलांनी परदेशात शिक्षण हे केवळ स्वप्न बघितले होते. मात्र या योजनेद्वारे परदेशात प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यंदा अमरावती विभागातून तीन विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत.

- सुनील वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, अमरावती

टॅग्स :Educationशिक्षणScholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी