शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही महादेव खोरीचे भाई आहोत, ओळखत नाही का?' म्हणत तरुणाची निघृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:56 IST

नांदगाव पेठमध्ये थरार : गाडीचा कट, क्षणात आवळल्या आरोपींच्या मुसक्या, १५ पर्यंत पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'आम्ही महादेव खोरीचे भाई आहोत', अशी गर्जना करत तिघांनी मिळून एका तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या केली. गौरव सुधाकर घोटेकार (३४, रा. अंजनगाव सुर्जी) असे या घटनेतील मृताचे नाव आहे.

ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री ८:४५ च्या सुमारास नांदगाव पेठ टोलनाक्याजवळील सर्व्हिस रोडवर घडली. या घटनेत गौरवचा भाऊ सौरभघोटेकार (३०) हादेखील जखमी झाला आहे. याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी सौरभच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला तथा काही तासात तिघांनाही बेड्या ठोकल्या. तिघांनाही १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंजनगाव सुर्जी येथील मूळ रहिवासी असलेले सौरभ आणि गौरव हे नांदगाव पेठ येथील नमन विहार येथे राहात होते. बुधवारी रात्री दोन्ही भाऊ रेमंड कंपनीतील काम आटोपून जेवण करून दुचाकीने घरी परतत होते.

झपकन चाकुच काढला

नांदगाव पेठ स्टॅण्डजवळील सर्व्हिस रोडवरील एका स्पीड ब्रेकरजवळ मागून आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. धडक लागल्याचा जाब विचारला असता, आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. हमको जानते नही क्या? हम महादेव खोरी के भाई लोग है, असे म्हणत आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

गौरवचे वाटेतच सोडले प्राण

वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी आदेश तेलमोरे याने आपल्याजवळील धारदार चाकू काढून गौरवच्या दोन्ही पायांच्या मांडीवर खोलवर वार केले. गौरव रक्ताच्या थारोळ्यात कोसळला असतानाच, सौरभवाचवण्यासाठी धावला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. दोन्ही भावांवर हल्ला करून ते पसार झाले. उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना गौरवचा वाटेतच मृत्यू झाला.

पोलिसांची तत्परता

  • नांदगाव पेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ चक्रे फिरवली. या थरारक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली.
  • गुन्हे शाखाप्रमुख संदीप चव्हाण यांच्या टीमने तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेतला. ठाणेदार दिनेश दहातोंडे आणि संदीप चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने आदेश तेलमोरे (२५), दीप उर्फ यशोदीप विनायक वेलकर (२५) आणि रोहित संजय तायडे (२३, तिन्ही रा. महादेवखोरी, अमरावती) या तिन्ही आरोपींना काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
  • क्षुल्लक कारणावरून 'भाईगिरी' दाखवत एका तरुणाचा जीव घेणाऱ्या या गुंडांमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. आता तिघांनाही पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यातून अधिक उलगडा होईल.
English
हिंदी सारांश
Web Title : Youth Brutally Murdered After Boasting 'We are Bhai's of Mahadev Khori'

Web Summary : A young man, Gaurav Ghotekar, was brutally murdered near Nandgaon Peth toll plaza by three individuals claiming to be 'bhais' from Mahadev Khori. His brother was also injured. Police arrested the three assailants.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती