पवित्र स्रानासाठी भाविक देऊरवाड्याच्या वाटेवर
By Admin | Updated: July 15, 2015 00:04 IST2015-07-15T00:04:50+5:302015-07-15T00:04:50+5:30
पूर्णा व मेघा नदीच्या संगमावर वसलेले देऊरवाडा हे गाव, आध्यात्मिक व पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले गेले आहे.

पवित्र स्रानासाठी भाविक देऊरवाड्याच्या वाटेवर
अधिक मास : पूर्णा-मेघा नदीच्या संगमावरील स्रानाला विशेष महत्त्व
सुमित हरकुट चांदूरबाजार
चांदूरबाजार : पूर्णा व मेघा नदीच्या संगमावर वसलेले देऊरवाडा हे गाव, आध्यात्मिक व पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले गेले आहे. म्हणूनच पुरातन काळात या गावाला देवांचा वाडा म्हणून संबोधण्यात आले आहे. या दोन्ही नद्यांच्या संगमावरील पवित्र स्रानाला विष्णूपुराणात महत्वपूर्ण सांगितल्या गेले. त्यामुळे अधिकमासातील व्रतवैकले व स्रानादी कार्यासाठी भक्तांची पाऊले देऊरवाड्याचे वाटेवर आहे.
देवांचा वाडा असलेल्या या गावाला शब्दांचा अपभ्रंश होऊन देऊरवाडा जरी म्हटल्या जात असले तरी आजही या तीर्थक्षेत्राचे पौराणिक व आध्यात्मिक महत्त्व तसूभरही ढळणे नाही. या पवित्र भूमिवर देवतांचे अनेक वर्षे वास्तव्य राहिल्यामुळे या गावाला देवाचा वाडा हे नाव पडले. पूर्णा व मेघा नदीच्या काठावर वसलेल्या या गावाला एकूण १८ तिर्थ स्थापित आहेत. यात सोमतीर्थ, क्रीडा तीर्थ, पर्वतीर्थ, अमृत तीर्थ, गरूडतीर्थ, विशालतीर्थ, लक्ष्मीतीर्थ, कमालमोचन तीर्थ, अग्नीतीर्थ, पिशाच्चतीर्थ, भानूतीर्थ, क्रुतशौच्चंतीर्थ, वाघेश्वरीतीर्थ, पितृतीर्थ, अवदूंबर तीर्थ, कन्वती तीर्थ, रुद्रतीर्थ, उमातीर्थ इत्याची तिर्थांचा समावेश आहे.