हिवरखेड येथील पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:33+5:302021-09-09T04:17:33+5:30
फोटो - मोर्शी : जिवाची पर्वा न करता पाच फूट पाण्यात उतरून खंडित झालेला पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करून ...

हिवरखेड येथील पाणीपुरवठा सुरळीत
फोटो -
मोर्शी : जिवाची पर्वा न करता पाच फूट पाण्यात उतरून खंडित झालेला पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करून हिवरखेडवासीयांना महावितरणने दिलासा दिला. पाच फूट पाण्यात ही कामगिरी फत्ते करण्यात आली.
हिवरखेड परिसरात ६ सप्टेंबर रोजीरोजी रात्री मुसळधार पावसासह विजेच्या कडकडाटामुळे गावठाण वाहिनीवर बिघाड झाला. त्यामुळे हिवरखेड गावातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हिवरखेड वाहिनी ही धरणक्षेत्रामधून चार ते पाच फुट पाण्यातून गेलेली आहे. महावितरणचे हिवरखेड येथील कर्मचारी अमोल मेसेकर, प्रफुल श्रीराव, जितेंद्र मोहरले, राहुल गायकवाड व प्रमोद घोरपडे यांनी कोणत्याही परिस्थितीत हिवरखेड गावातील पिण्याचा पाणीपुरवठा खंडित राहू नये, यासाठी त्यांनी जिवाची पर्वा न करता चार ते पाच फूट खोल पाण्यात उतरून या वाहिनीवरचा बिघाड शोधून काढला व वीजपुरवठा सुरळीत केला.