मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी नमुने; जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:28 AM2019-01-11T01:28:11+5:302019-01-11T01:28:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य केंद्रस्थानी ठेवून राज्यभरात १ आॅक्टोबर ते ३१ ...

Water samples through mobile app; District top | मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी नमुने; जिल्हा अव्वल

मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी नमुने; जिल्हा अव्वल

Next
ठळक मुद्दे९१ टक्के काम : पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य केंद्रस्थानी ठेवून राज्यभरात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. यात अमरावती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ९१.७७ टक्के काम पूर्ण करून राज्यात दुसरा, तर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्यभरात विविध जिल्हा परिषदांनी २ लाख ६९ हजार २४७ पैकी २ लाख ०२ हजार ५९३ पिण्याच्या पाण्याच्या मूळ स्रोतांचे नमुने घेतले व या स्रोतांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे मॅपिंग करण्यात आले. यात अमरावती जिल्ह्याचे ७ हजार ८७६ एवढे उद्दिष्ट होते. त्यापैकी ७ हजार ७९४ स्रोतांचे पाणी नमुने घेण्यात आले, तर ७ हजार २२८ मूळ स्रोतांचे मॅपिंग करण्यात आले.
जिल्ह्यात हे काम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांच्यासह पाणी गुणवत्ता सल्लागार नीलिमा इंगळे ,जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक राजेश चºहाटे आदींनी ग्रामस्तरावर सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून पूर्ण केले. यामुळेच जिल्हा राज्यात द्वितीय स्थानी आला आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणी व गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जलस्रोतांचे नमुने घेण्यात जिल्हा राज्यात दुसरा व विभागात अव्वल आहे. यापुढे राज्यात प्रथम क्रमांक गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- मनीषा खत्री
सीईओ, जिल्हा परिषद

Web Title: Water samples through mobile app; District top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.