शिंदी येथे पाण्यासाठी आक्रोश
By Admin | Updated: June 4, 2015 00:08 IST2015-06-04T00:08:11+5:302015-06-04T00:08:11+5:30
अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. वॉर्ड १, २ मध्ये गेल्या २० दिवसांपासून पाणीच नसल्याने ...

शिंदी येथे पाण्यासाठी आक्रोश
२० दिवसांपासून ठणठणाट : आंघोळ बंद, घशाला पडली कोरड
नरेंद्र जावरे अचलपूर
अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. वॉर्ड १, २ मध्ये गेल्या २० दिवसांपासून पाणीच नसल्याने सर्वांच्या आंघोळी बंद झाल्या असून पिण्याचे पाणीही मिळत नसल्याने घशाला कोरड पडली आहे.
पाण्याचे नियोजन व्यवस्थित नसल्याने शिंदी येथे गेल्या ५० वर्षात प्रथमच इतकी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यापूर्वी शिंदी येथे १० दिवसांआड पाणी मिळायचे. परंतु पाण्याच्या टाकीत ज्या बोअरवेलमधून पाणी पुरवठा होत होता ते बोअरवेलच आटत चालल्याने टाकीत पाणी पोहोचणे कमी झाले. परिणामी टाकीतील पाण्याचा दाब कमी झाल्याने टाकीत पाणी पोहोचविण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले असून आता नागरिकांना पाणी उपलब्ध कसे करावे, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळा मोठ्या प्रमाणात तापत असल्याने पाण्याची सर्वच बाबींसाठी गरज आहे. २० दिवसांपासून पाणी नसल्याने गावकरी हैराण झाले आहेत.