जलव्यवस्थापन समितीत पाणीपुरवठ्यावर घमासान
By Admin | Updated: November 15, 2014 01:12 IST2014-11-15T01:12:50+5:302014-11-15T01:12:50+5:30
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध ...

जलव्यवस्थापन समितीत पाणीपुरवठ्यावर घमासान
अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरून आयोजित करण्यात आली होती. या सभेत पाणीपुरवठा आणि सिंचन विभागाच्या प्रश्नावर चांगलेच घमासान झाले.
जिल्हा परिषद जलव्यस्थापन समितीच्या सभेत जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना आणि अपूर्ण असलेल्या योजना तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सभेत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत जलस्वराज योजनेचा टप्पा क्र. २ सुरू होत आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील जुना धामणगाव, अजंनगाव सुर्जी, मंगरूळ दस्तगीर, जरूड या गावांची प्रायोगिक तत्त्वावर आदी गावात जलस्वराज योजनेची कामे केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्र्वेता बॅनर्जी यांनी सभागृहात दिली. सिंचन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारा, साठवण बंधाऱ्यांची कामांसंदर्भात सभागृहात या विभागाचे कार्यकारी अभियंता यू. जे. क्षीरसागर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
जव्यवस्थापन समितीच्या सभेत शासनाकडून पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेला प्रोत्साहन अनुदानाचा निधी उपलब्ध असताना या अनुदानासाठी जिल्ह्यातील अमरावती पंचायत समिती वगळता एकाही पंचायत समितीने प्रस्ताव सादर केला नसल्याचा प्रकार 'लोकमत'ने उजेडात आणताच लोकमतचा पुरावा देत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचा काय पाठपुरावा केला आहे याची माहिती पुढील सभेत देण्याची सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, बांधकाम सभापती गिरीश कराळे, महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, कृषी सभापती अरूणा गोरले, समाज कल्याण सभापती सरिता मकेश्र्वर सदस्य सदाशिव खडके अरूणा गावंडे कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा श्र्वेता बॅनजी, कार्यकारी अभियंता सिंचन यू. जे. क्षीरसागर, उपविभागीय अभियंता आनंद दासवत, संदीप देशमुख, दीपक डोंगरे, प्रदीप ढेरे, भगवंत इश्र्वरकर, येवले यांच्यासह पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता आदी उपस्थित होते.