२८ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट, १५९ विहिरींची जलपातळी तपासली
By Admin | Updated: November 17, 2015 00:12 IST2015-11-17T00:12:51+5:302015-11-17T00:12:51+5:30
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली असता २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे.

२८ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट, १५९ विहिरींची जलपातळी तपासली
भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणा विभागाचा अहवाल
अमरावती : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली असता २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे.
यंदा पाऊस सरासरी चांगला झाला असतानाही काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट पाहायला मिळत आहे. दरवर्षी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाकडून मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात जिल्ह्यातील विविध विहिरींची जलपातळी तपासली जाते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १७३ विहिरींवर मॉनिटरिंंग केले असून सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली. त्यामध्ये २८ गावांमधील विहिरींची जलपातळी खालावल्याचे आढळून आले. पाच वर्षांच्या सरासरीचे अनुमान घेऊन ही जलपातळी काढल्यानंतर २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
११ तालुक्यांत पर्जन्यमान घटले
अमरावती : यंदा १४ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात पर्यज्यमान घटले आहे. त्यामध्ये अमरावती, मोर्शी, वरुड, दर्यापूर, चांदुररेल्वे, चांदूरबाजार, चिखलदरा, धामणगाव, अचलपूर, धारणी व भातकुली गावाचा सहभाग आहे. तर पर्यजन्यमान वाढलेली नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी व तिवसा ही गावे आहे. या सर्व गावातील १५९ विहिरीच्या तपासणीत २८ गावांमध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे. मेळघाट सारख्या उंच ठिकणच्या गावांमध्ये पाऊस अधिक पडल्यावरही विहिरीची जलपातळी कमी असल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले.