शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वऱ्हाडात जानेवारीपासूनच तीन हजारावर गावांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 10:29 IST

विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साईड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे मंथन ५,५२९ उपाययोजनांचा उतारा; ७९ कोटी प्रस्तावित

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साईड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे. याविषयी विभागीय आयुक्त कार्यालयाने ५,५२९ उपाययोजना प्रस्तावित केल्या. यावर ७९ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.यंदा पावसाळ्यात ७७७.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ५८१ मिमी पडला. या चार महिन्यात केवळ ३६ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणीटंचाईची स्थिती जिल्हा प्रशासनाला विशद केली. मात्र, सर्वच जिल्हा परिषदांनी हा गंभीर विषय दुर्लक्षित केला. त्यामुळेच पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यांना विलंब झाला. विभागीय आयुक्तांनी याविषयी संबंधितांचे कान उपटल्यानंतर तब्बल महिनाभर उशिराने आराखडा तयार करण्यात आला. त्याचा एकत्रित कृती आराखडा गुरुवारी तयार करण्यात आला.विभागात जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान १,९१५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी २६५३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर ३४ कोटी ४५ लाख ७६ हजारांचा निधी खर्च होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत १,३११ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. त्यासाठी १,६४१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर ११ कोटी ५४ लाख ४८ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये २६६ गावांतील ४३७ विहिरी खोल करून गाळ काढण्यात येणार आहे. यावर २.४३ कोटी खर्च होतील. २,२८० गावांमध्ये २५१२ खासगी विहिरींच्या अधिग्रहणावर १३.२३ कोटी, ५०३ गावांमध्ये ५२१ टँकरद्वारा पाणीपुरवठ्यावर १८.५८ कोटी, ५३१ गावांमध्ये नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीवर १९.५२ कोटी, ७९ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती, १,००७ गावांमध्ये १,१७१ नवीन विंधन विहिरींवर १०.७० कोटी, तर २९७ गावांमध्ये २३७ तात्पुरत्या नळ योजना तयार करण्यासाठी १५.३१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.टंचाईग्रस्त गावे, उपाययोजना व निधीअमरावती जिल्ह्यात १४२८ गावांसाठी १७४५ उपाययोजनांवर १७.९९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अकोला जिल्ह्यात ५३४ गावांतील १०८४ उपायोजनांवर २६.८५ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ७९७ गावांतील १२१९ उपाययोजनांवर १८.९४ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६७० गावांतील ९०३ उपाययोजनांवर १०.७९ कोटी व वाशिम जिल्ह्यात ५१० गावांसाठी ५७८ उपाययोजनांवर ४.४९ कोटींचा निधी खर्च होणार आहे. विभागातील जलप्रकल्पांमध्येदेखील सरासरी ४२ टक्केच साठा आहे. अकोला जिल्ह्यात ४१ खासगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :Waterपाणी