शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

२८३ गावांत जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:26 IST

जलस्रोत कोरडे पडल्याने सद्यस्थितीत २८३ गावांत पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. ४४५ गावांसाठी ५०७ उपाययोजनांना मंजुरात देण्यात आली. प्रत्यक्षात १८९ विंधन विहिरी व कूपनलिका व चार तात्पुरत्या नळ योजनांची कामेच आतापर्यंत पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देदाहकता वाढली : ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करतो काय?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत कोरडे पडल्याने सद्यस्थितीत २८३ गावांत पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. ४४५ गावांसाठी ५०७ उपाययोजनांना मंजुरात देण्यात आली. प्रत्यक्षात १८९ विंधन विहिरी व कूपनलिका व चार तात्पुरत्या नळ योजनांची कामेच आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. ४१ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीला मंजुरी असतानाही कामे सुरू नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करतोय काय अन् जलयुक्त शिवारची ७५८ जलपरिपूर्ण गावे कुठे, असा सवाल विचारला जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांच्या आचारसंहितेच्या कालावधीत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. याबाबत सचिवांनी २ मे रोजी व्हीसी ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी ३० एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली. त्यामुळे जिल्हा प्रशासनास्तरावर पाणीटंचाई चर्चेत आली. पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाने संयुक्त कृती आराखडा तयार केला. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ६७१ गावांसाठी १ हजार ९३९ उपाययोजना प्रस्तावित केल्यात. यावर २९ कोटी ४८ लाखांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. यापैकी ४४५ गावांच्या ५०७ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. या कामांवर १४ कोटी ६१ लाखांचा खर्च येणार आहे. प्रत्यक्षात २८९ गावांच्या ३१७ उपाययोजनांची कामे सुरू आहेत. यावर १२ कोटी ३९ लाखांचा निधी खर्च होणार आहे. सहा महिन्यांपासून पाणीटंचाईच्या कामांचे नियोजन असताना आतापर्यंत फक्त १८० विंधन विहिरी व कूपनलिका तसेच चार तात्पुरत्या पूरक नळ योजना, दोन नळयोजनांची विशेष दुरुस्ती पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.सद्यस्थितीत ४८ गावांमध्ये ५६ विंधन विहिरींची कामे सुरू आहेत. यावर ६७ लाखांचा निधी अपेक्षित आहेत. ८० गावांतील ८० नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यावर ५ कोटी ९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ६३ गावांतील तात्पुरत्या नळ योजनांच्या कामावर ५ कोटी ६२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. १६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. . यावर २० लाखांचा खर्च होणार आहे. ८७ गावांमध्ये ११० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यावर १ कोटी २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. प्रशासनाद्वारे योजले जाणारे उपाय म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार ठरला आहे.जलपरिपूर्ण गावे तहानली कशी?जलयुक्त शिवार योजनेमध्ये तीन वर्षांत जिल्ह्यात ७५८ गावे १०० टक्के जलपरिपूर्ण झाल्याचे दावा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आला. मात्र, जिल्ह्यातील दुष्काळ व पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता, हा दावा तद्दन खोटा ठरला आहे. शासनस्तरावर अमरावती तालुक्यात ५५, भातकुली ५५, तिवसा २९, चांदूर रेल्वे ४६, नांदगाव खंडेश्वर ७०, धामणगाव रेल्वे २६, मोर्शी ८३, वरूड ७९, अचलपूर ५३, चांदूर बाजार ५३, दर्यापूर ४४, अंजनगाव सूर्जी ३६, चिखलदरा ६० व धारणी तालुक्यात ६५ गावे जलपरिपूर्ण आहेत, तर प्रत्यक्षात बहुतांश तहानली आहेत.नळ योजनांची विशेषदुरुस्तीच नाहीपाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ४१ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली. यावर १ कोटी ६३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी एकाही योजनेचे काम मे महिना लागला तरी सुरू झालेले नाही. तात्पुरत्या ६३ नळ योजनांची कामे मंजूर आहेत. चारच कामे पूर्ण झाली. केवळ खासगी विहिरींचे अधिग्रहण व जास्त ओरड असल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच भर दिला जात असल्याने या मुद्द्यावर यंत्रणा गंभीर नसल्याचा आरोप होत आहे.जलयुक्तच्या १६,१४२ कामांचे आॅडिट केव्हा?तीन वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १६ हजार १४२ कामे व ३१९ कोटींचा खर्च केल्यावरही जिल्हा तहानलेलाच आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या १४ प्रशासकीय यंत्रणांद्वारे झालेली ही कामे चर्चेत आली आहेत. या कामांचे पाणी कुठे मुरले, हे शोधन्यासाठी या सर्व कामांचे सोशल आॅडिट होणे गरजेचे आहे, अन्यथा खर्च ३१९ कोटींचा निधी पाण्यातच गेला, अशी स्थिती उद्भवणार आहे.पाणीटंचाई निवारणार्थ सातत्याने आढावा घेण्यात आलेला आहे. आचारसंहितेच्या काळातही यासंदर्भात उपाययोजना सुरू होत्या. सर्व अधिकारी या कामांना प्राधान्य देत आहेत.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

टॅग्स :water shortageपाणीटंचाई