लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्याने पाण्याची मागणी व वापर वाढला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील मुख्य ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ६३ टक्के जलसाठा असल्याने प्रशासनासह सर्वांचीच चिंता वाढली आहे.
धरणात १,०४७ द.ल.घ.मी. पाणीसाठ्याची क्षमताजिल्ह्यातील लहान-मोठ्या ५६ प्रकल्पांत १०४७.३० द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता आहे. यात ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ५६४.०५ द.ल.घ.मी., मध्यम ७ प्रकल्पात २५६.२४ द.ल.घ.मी. व ५६ लघुप्रकल्पांत २२७.०१ द.ल.घ.मी पाण्याची साठवण क्षमता आहे
अमरावती जिल्हास्थिती
- ५६ एकूण प्रकल्प आहेत. यामध्ये मोठे प्रकल्प १, मध्यम ७ व लघुप्रकल्प ४८ आहेत.
- ६० टक्के जलसाठा, या सर्व प्रकल्पांत सहाः स्थितीत सरासरी ६०.७३ टक्के जलसाठा आहे.
- ५९ टक्के गतवर्षी जलसाठा, या सर्व प्रकल्पांत गतवर्षी याच तारखेला ५९.८५ टक्के साठा होता.
- ६३८ द.ल.घ.मी., आजचा उपयुक्त जलसाठा व १,०४७ द.ल.घ.मी. प्रकल्पीय उपयुक्त साठा आहे.