वरुड शहर कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:39+5:30

युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषि साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ आदी व्यावसायिकांनी पाठिंब्याचे पत्र देऊन उपोषणाला समर्थन जाहीर केले. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आपआपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ उपोषण सुरू आहे.

Warud city closed tight | वरुड शहर कडकडीत बंद

वरुड शहर कडकडीत बंद

ठळक मुद्देउपोषणाचे समर्थन : आत्मक्लेश आंदोलन सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : वाळलेल्या संत्रा झाडांचे सर्वेक्षण करून अनुदान देण्याच्या मागणीसाठी १ सप्टेंबरपासून पुकारण्यात आलेल्या आत्मक्लेश उपोषणाला पाठिंबा म्हणून मंगळवारी वरूड शहर कडकडीत बंद राहिले. युवा व्यापारी संघ, व्यापारी संघटना, कृषि साहित्य विक्रेता संघ, सुवर्णकार संघ आदी व्यावसायिकांनी पाठिंब्याचे पत्र देऊन उपोषणाला समर्थन जाहीर केले. मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आपआपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ उपोषण सुरू आहे. तीन दिवसांत उपोषणस्थळी कुणीही भेट दिलेली नाही.
वरुड, मोर्शी तालुक्यांमध्ये १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा बाधित झाला असताना सरकारला अद्यापही जाग आली नसल्याचा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १ सप्टेंबरपासून येथील केदार चौकस्थित महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात आत्मक्लेश उपोषण करीत आहेत. ऋषीकेश राऊत, गौरव गणोरकर, अरविंदराव मोरे, गंगाधरराव पंढरे, रुपेश जिचकार, भूषण कराळे, नीलेश कोरडे, जावेद शेख आदी आंदोलनात सहभागी झाले.

Web Title: Warud city closed tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप