रविवारपर्यंत उष्णतेची लाट, पुन्हा अवकाळीची शक्यता

By Admin | Updated: May 17, 2016 00:02 IST2016-05-17T00:02:27+5:302016-05-17T00:02:27+5:30

कोरड्या हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सुरू असलेली उष्णतेची लाट रविवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

Warmth of Sunday, resurgence of chance | रविवारपर्यंत उष्णतेची लाट, पुन्हा अवकाळीची शक्यता

रविवारपर्यंत उष्णतेची लाट, पुन्हा अवकाळीची शक्यता

अमरावती : कोरड्या हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सुरू असलेली उष्णतेची लाट रविवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तविला आहे. मंगळवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली होती. मात्र, राज्यात कोरडे हवामान तयार झाल्याने तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राला बसला आहे. जिल्ह्यासह विदर्भातील शहराचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या आसपास पोहोचला आहे. पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार १६ ते १८ मे दरम्यान विदर्भ, मराठवाड्यासह बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Web Title: Warmth of Sunday, resurgence of chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.