वर्धा, चंद्रभागा फुगली

By Admin | Updated: July 9, 2016 00:06 IST2016-07-09T00:06:55+5:302016-07-09T00:06:55+5:30

तालुक्यात शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने चंद्रभागा, वर्धा नदी फुगली असून पहिल्यांदाच या पावसाळ्यात पूर आला आहे़ ...

Wardha, Chandrabhaga Fugli | वर्धा, चंद्रभागा फुगली

वर्धा, चंद्रभागा फुगली

सरासरीपेक्षा अधिक पाऊस : सतर्कतेचा इशारा
धामणगाव रेल्वे : तालुक्यात शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने चंद्रभागा, वर्धा नदी फुगली असून पहिल्यांदाच या पावसाळ्यात पूर आला आहे़ सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नदी काठावरील गावांना सर्तकतेचा ईशारा तालुका प्रशासनाने दिला आहे़
धामणगाव तालुक्यात वर्धा, चंद्रभागा,खोलाड, विदर्भ, मोती कोळसा, अशा नद्या तर कोल्हा, बेडकी, यासह ३२ मोठे नाले आहेत़ काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नद्या व नाल्यांना पहिल्यांदाच पूर आला आहे़ चंद्रभागा नदीच्या काठावर कळाशी, भिल्ली, सोनेगाव खर्डा, निंभोरा राज, तर अंजनसिंगी भागातून विदर्भ नदी गेली आहे़ मोती कोळसा नदीच्या पुराचा फटका तळेगाव दशासर व शेंदुरजनाखुर्द या गावांना बसतो पावसाचा जोर अधिक कायम असल्यास या गावात पाणी शिरण्याचे प्रकार वाढतात.त्यामुळे तालुका प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे़ धामणगाव, दत्तापूर, अंजनसिंगी, तळेगाव दशासर, मंगरूळ दस्तगीर, चिंचोली, भातकुली या मंडळात अधीक पाऊस झाल्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश तहसीलदार चंद्रभान कोहरे यांनी दिले आहे़
(तालुका प्रतिनिधी)

विदर्भ नदीला पूर
१२ गावांचा संपर्क तुटला
विदर्भ नदीला पूर आल्यामुळे धामणगाव - तिवसा मार्गावरील वाहतूक बंद आहे. तर धामणगाव तालुक्यातील १२ गावांचा संपर्क तुटला. १२ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: Wardha, Chandrabhaga Fugli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.