वरुड येथे पैशाच्या वादातून महिलेची हत्या
By Admin | Updated: October 4, 2015 01:09 IST2015-10-04T01:09:53+5:302015-10-04T01:09:53+5:30
पैशाच्या वादातून एका ३५ वर्षीय महिलेची हातोड्याने डोक्यावर मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी स्थानिक मिरची प्लॉट भागात घडली.

वरुड येथे पैशाच्या वादातून महिलेची हत्या
वरूड : पैशाच्या वादातून एका ३५ वर्षीय महिलेची हातोड्याने डोक्यावर मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी स्थानिक मिरची प्लॉट भागात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, हत्या झालेल्या महिलेचे नाव रामप्यारी मून्ना उईके (३५ रा. पिंगळानगर मिरची प्लाट) असे आहे. आरोपीचे नाव झुमकू पैकू उईके (४२ रा.वरुड) असे आहे. रामप्यारी उईके यांचे पती २००४ मध्ये मरण पावल्याने ती तीन मुलांसह आरोपीकडे वास्तव्यास होती. आरोपीने अनैतिक संबंधाचा संशय व्यक्त करुन वारंवार पैशाचा वाद होत होता. अखेर हा वाद विकोपाला गेल्याने शुक्रवारी पहाटे चार वाजतादरम्यान आरोपी झुमकू पैकू उईके याने हातोडी डोक्यावर मारली. अंगावर वार करुन गंभीर जखमी करुन जागीच ठार मारले. याप्रकरणाची रीतसर तक्रार वरुड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर ठाणेदार अर्जुन ठोसरे, सहायक पोलीस निरीक्षक चित्तरंजन चांदुरे , ए.एस.आय श्रीराव, शिंदेसह पोलीस पथकाने जावून घटनास्थळ गाठले. यावेळी मृत रक्ताच्या थारोळयात पडली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आरोपीला अटक केली.