आडत्यांना ‘वार टू वार’ पेमेंट
By Admin | Updated: May 27, 2016 00:38 IST2016-05-27T00:38:54+5:302016-05-27T00:38:54+5:30
अडत्यांना खरेदीदाराकडून मिळणारे पेमेंट यानंतर ‘वार टू वार’ अर्थात एका आठवड्यात मिळणार आहे.

आडत्यांना ‘वार टू वार’ पेमेंट
बाजार समिती : सभापतींची यशस्वी मध्यस्थी, संप मिटला
अमरावती : अडत्यांना खरेदीदाराकडून मिळणारे पेमेंट यानंतर ‘वार टू वार’ अर्थात एका आठवड्यात मिळणार आहे. याशिवाय रकमेमधील अनियमितता वा विलंबाबाबत ७ सदस्यीय समिती गठित करण्यात आली. त्यानंतर बाजार समितीतील अडत्यांचा संप संपुष्टात आला. बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी मध्यस्थी करीत अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा रकमेबाबत लेखी हमी दिली.
गुरुवार सकाळपासून बाजार समितीतील ४५० पेक्षा अधिक अडत्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे तूर, गहू, सोयबीन ४ हरभरा या धान्याचा लिलाव थांबला होता. यानंतर सभापती सुनील वऱ्हाडे यांनी अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व तारेडगा काढला. दुपारी १२ वाजता याबाबत तोडगा काढण्यात आला. ७ सदस्यीय समिती गठित करण्याचे सांगण्यात आले. यात २ खरेदीदार प्रतिनिधी, २ अडत्या प्रतिनिधी, २ शेतकरी संचालक, समिती सचिवाचा समावेश राहील. ही समिती गठित झाल्यानंतर समितीची सभा शनिवारला समितीच्या कार्यालयात सायंकाळी ५ वाजता होईल,असे ही ठरविण्यात आले आहे.