मध्यवर्ती कारागृहाच्या भिंती होणार कलरफुल

By Admin | Updated: September 6, 2016 00:15 IST2016-09-06T00:15:30+5:302016-09-06T00:15:30+5:30

परंपरागत पांढऱ्या रंगाच्या असलेल्या कारागृहाच्या पाषाण भिंती आता लोकसहभागातून कलरफुल करण्याचा निर्णय सोमवारी कारागृह प्रशासनाने घेतला आहे.

The walls of the central jail will be shining | मध्यवर्ती कारागृहाच्या भिंती होणार कलरफुल

मध्यवर्ती कारागृहाच्या भिंती होणार कलरफुल

गणेशोत्सव साजरा : पीडित कुटुंबीयांसाठी बंदीजनांचा पुढाकार
अमरावती : परंपरागत पांढऱ्या रंगाच्या असलेल्या कारागृहाच्या पाषाण भिंती आता लोकसहभागातून कलरफुल करण्याचा निर्णय सोमवारी कारागृह प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवापासून या अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला असून यात विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे अभिवचन दिले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी येथील मध्यवर्ती कारागृहात विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करण्यात आले. यावेळी वऱ्हाड संस्था, आर्ट आॅफ लिव्हिंग, दिशा संस्था, ओम शांती, अवेरनेस संस्था, आर. के. मेलोडीज आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान कारागृहात सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती अधीक्षक ढोले यांनी दिली. कारागृहांच्या भिंती या ब्रिटिशकालीन असून त्या भिंतीना नवा लूक देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. पाषाण भिंतीच्या आत हातून कळत न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित शिक्षेच्या रुपात भोगणाऱ्या कैद्यांच्या मनात वैफल्य निर्माण होऊ नये, यासाठी त्यांचे मन प्रसन्न व प्रफुल्लीत राहावे, यासाठी कारागृहाच्या भिंतीना वेगवेगळा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला येथील आॅर्ट आॅफ लिव्हिंगने पूर्णत्वास नेण्याचा मानस व्यक्त केला. तसेच कॅरम खेळण्यासाठी पावडर उपलब्ध करून देण्याची मागणी काही कैद्यांनी केली असता ती देखील आॅर्ट आॅफ लिव्हिंगने मान्य केली. दरम्यान कुमुदिनी इंगळे यांनी कारागृहातील बंदीजनांना बॉलपेन वाटप करण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सवात पहिल्यांदाच कैदी एकत्र आले होते, हे विशेष. कैद्यांनी कायदेविषयक प्रश्न, समस्या मांडताना त्या सामाजिक संस्थांनी सोडविण्याचे आश्वासित केले. यावेळी वऱ्हाड संस्थेचे प्रमुख रवींद्र वैद्य, कुमुदिनी इंगळे, अमित सहारकर, राजेश पछेल, प्रवीण खानपासोळे, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, तुरुंगाधिकारी प्रवीण मोडकर, माळशिखरे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी भूषण कांबळे, महापालिका उपअभियंता बोबडे, सुभेदार तिवस्कर, सुभेदार पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सहा बंदीजनांनी मदतीचा घेतला वसा
समाजात पिडीत असलेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी बंदीजनांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना श्रमातून मिळविलेली कमाई ही समाजाच्या कामी यावी, यासाठी सहा बंदीजनांनी पडिीत कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे ठरविले आहे. पिडीत कुटुंबियांपर्यत ही आर्थिक मदत पोहचविण्यसाठी वऱ्हाड संस्था पुढाकार घेणार आहे. यात वामन फड, सुरेश दाभाडे, बंटी उप्पलवार, ज्ञानदेव सोनोने, सुनील तातयडे, गणीराम ठाकरे या बंदीजनांना समावेश आहे.

Web Title: The walls of the central jail will be shining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.