पीक कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ
By Admin | Updated: June 7, 2016 07:35 IST2016-06-07T07:35:40+5:302016-06-07T07:35:40+5:30
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर अडीच लाख रुपयांपर्यंतच्या पीक व मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पीक कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ
शासनधोरण : दुष्काळी परिस्थितीमुळे निर्णय
अमरावती : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर अडीच लाख रुपयांपर्यंतच्या पीक व मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून पीक कर्जाचा आढावा घेतला. राज्यात सलग ४ वर्ष दुष्काळी परिस्थिती असल्याने या आर्थिक वर्षासाठी सर्व प्रकारच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बऱ्याच ठिकाणी पीक कर्जाचे पुनर्गठन करताना शेतकऱ्याला पीक विम्याची मिळालेली रक्कम बँकाकडून कापून घेण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने बँकांनी शेतकऱ्यांप्रती माणुसकी दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक भार न पडता पीक कर्ज सुलभरीत्या उपलब्ध होण्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत त्यांची संख्या कमी करावी या संदर्भातील स्पष्ट मार्गदर्शक सूचना राज्यस्तरीय बँक समितीने तातडीने सर्व बँकांना पाठवाव्यात, कर्ज पुनर्गठन करतेवेळी सर्च रिपोर्ट संदर्भात देखील रिझर्व्ह बँकेने नव्याने सूचना सर्व बँकांना द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन मोडमध्ये काम करावे. पीक कर्ज वितरणामध्ये विभागातील वाशिम जिल्हा आघाडीवर असून अन्य जिल्ह्यांनी वाशिम जिल्ह्याप्रमाणे याकामी प्रगती करावी. वेळेत कर्ज मिळाल्यास शेतकरी बांधवांना दिलासा करण्यासाठी दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाईचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.