‘त्या’ सिनेट सदस्यांना ‘शो-कॉज’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:58+5:302021-02-05T05:28:58+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २९ डिसेंबर २०२० रोजी पार पडलेल्या सिनेट सभेत विद्यापीठाची बदनामी केल्याप्रकरणी काही ...

Waiting for ‘those’ senators to ‘show-cause’ | ‘त्या’ सिनेट सदस्यांना ‘शो-कॉज’ची प्रतीक्षा

‘त्या’ सिनेट सदस्यांना ‘शो-कॉज’ची प्रतीक्षा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २९ डिसेंबर २०२० रोजी पार पडलेल्या सिनेट सभेत विद्यापीठाची बदनामी केल्याप्रकरणी काही सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय झाला. मात्र, महिन्याभरानंतरही ‘त्या’ सिनेट सदस्यांना प्रशासनाकडून ‘शो-कॉज’ बजावण्यात आले नाही. त्यामुळे विद्यापीठाची बदनामी प्रकरण थंडबस्त्यात तर नाही, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

नुटाचे प्रवीण रघुवंशी, विवेक देशमुख, संतोष ठाकरे, प्रदीप देशपांडे यांच्या पुढाकाराने डिसेंबर महिन्यात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या विरोधात पत्रपरिषद घेण्यात आली होती. सिनेट सभा ऑफलाईन घेण्यात आली नाही आणि काही सदस्यांचे प्रश्न मुद्दामपणे नाकारले, असा आरोप करण्यात आला होता. यावरून कुलगुरू विरूद्ध नुटा संघटना असे चित्र तयार झाले. २९ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ऑनलाईन सभेचा बहिष्कार करीत काही सदस्यांनी प्रशासनाचा धिक्कार नोंदविला होता. परंतु , ऑनलाईन सिनेट सभा प्रारंभ हाेताच रवींद्र कडू यांनी काही सिनेट सदस्यांनी प्रश्न नाकारले किंवा सभा ऑनलाईन घेतली हा मुद्दा सिनेटमध्ये मांडणे अपेक्षित होते. मात्र, जाहीरपणे पत्रपरिषद घेऊन कुलगुरुंवर आरोप करणे आणि विद्यापीठाची बदनामी करणे हे नियमबाह्य असल्याची बाब कडू यांनी उपस्थित केली. याविषयावर अनेक सदस्यांनी मते नोंदविली. त्यानंतर जाहीर पत्रपरिषद घेऊन विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या सिनेट सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून

खुलासा मागविण्याचा निर्णय सिनेटमध्ये घेण्यात आला. मात्र, प्रशासनाकडून अदयापही कारणे दाखवा नोटीस बजावली नाही, अशी माहिती आहे.

-----------------------------------

कोट

अद्यापपर्यंत विद्यापीठाने सिनेट सदस्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली नाही. नेमके कुलगुरू्ंना काय खुलासा पाहिजे, हे नोटीस आल्यान्ंतरच कळेल. आम्ही देखील नोटीसच्या प्रतीक्षेत आहोत. सिनेट आटोपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नोटीस बजावते येते.

-प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष नुटा तथा सिनेट सदस्य

----------------------

जेमेतेम सिनेट सभेचे कार्यवृंत्तात मंजूर झाले आहे. कुलगुरूंच्या निर्णयानुसार विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या जातील. खुलासा मागवू आणि त्यानंतरच कार्यवाही निश्चित केली जाईल.

- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

Web Title: Waiting for ‘those’ senators to ‘show-cause’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.