‘त्या’ अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:48+5:30
आरोपी कारागृहात असताना मृत विद्यार्थिनीच्या जन्मदात्याने ठाणेदाराविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेली तक्रार, नव्या अधिकाऱ्याकडे सोपविलेला तपास, या सर्व बाबींच्या अनुषंगाने या प्रकरणातील वास्तवाकडे धामणगाववासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक मृत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शवविच्छेदन अहवालाचे पुनर्विलोकन करणार आहे.

‘त्या’ अहवालाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीची केलेली हत्या, आरोपी कारागृहात असताना मृत विद्यार्थिनीच्या जन्मदात्याने ठाणेदाराविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेली तक्रार, नव्या अधिकाऱ्याकडे सोपविलेला तपास, या सर्व बाबींच्या अनुषंगाने या प्रकरणातील वास्तवाकडे धामणगाववासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक मृत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शवविच्छेदन अहवालाचे पुनर्विलोकन करणार आहे.
धामणगाव शहरातील खुल्या मैदानावर ६ जानेवारी रोजी बारावीत शिकणाºया महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
या प्रकरणात ठाणेदारांनी वेळीच दखल घेतली असती तर माझ्या मुलीची हत्या झाली नसती, अशी तक्रार मृत विद्यार्थिनीच्या पित्याने जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन यांच्याकडे केली आहे. सदर घटनेत आरोपी सागर तितुरमारे याच्यावर बलात्काराचा व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यान्वये (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदाराविरुद्ध अधीक्षकांकडे झालेली तक्रार व मृत तरुणी असल्याने प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फरतडे यांच्याकडे सोपविण्यात आला. कविता फरतडे यांनी या तपासाला वेग दिला आहे. आता याप्रकरणा कोण किती दोषी आहेत, मृत विद्यार्थिनीच्या जन्मदात्यांनी केलेल्या तक्रारीत किती तथ्य आहे, हे पुढे येणार असल्याने धामणगावकरांचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
पोस्को दाखल
मृतक विद्यार्थिनीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. हा अहवाल दत्तापूर पोलिसांना सोपविण्यात आला. दत्तापूर पोलिसांनी लगेच आरोपीविरुध्द बलात्कार व पोस्कोचा गुन्हा दाखल केला. संबंधित शवविच्छेदन अहवाल पुनर्विलोकन जिल्हा शल्य चिकित्सक करणार असल्याची माहिती पुढे आली.