महाविद्यालये उघडण्याचे वेध, वसतिगृहांचे ऑनलाईन प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:38+5:302021-02-05T05:27:38+5:30
अमरावती : राज्य शासनाने महाविद्यालये उघडण्याचे संकेत दिल्यानंतर आदिवासी विकास विभाग अधिनस्थ वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहे. अमरावती ...

महाविद्यालये उघडण्याचे वेध, वसतिगृहांचे ऑनलाईन प्रवेश सुरू
अमरावती : राज्य शासनाने महाविद्यालये उघडण्याचे संकेत दिल्यानंतर आदिवासी विकास विभाग अधिनस्थ वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहे. अमरावती अपर आयुक्त अंतर्गत सात प्रकल्पांतून १३ हजारांपेक्षा अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
कोरोना संसर्गामुळे मार्चपासून शाळा, वसतिगृहे बंद आहेत. २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. आता २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळांत विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नाही. अमरावती जिल्ह्यातील आश्रमशाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी पोहोचलेच नाही. अदयापही पालकांमध्ये कोरोनाची दशहत कायम आहे. त्यामुळे आदिवासी पालकांनी आश्रमशाळांत मुलांना पाठविण्यासाठी संमतीपत्र लिहून देण्यास नकार दर्शविल्याचे चित्र आहे. आता वसतिगृहांत प्रवेशाची प्रक्रिया आरंभली जात आहे. इयत्ता आठवी ते पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तालुकास्तरावर आठवीपासून पुढे आणि जिल्हास्तरावर अकरावीच्या पुढे प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती ‘ट्रायबल’च्या शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त पी.पी. पंडितकर यांनी सांगितले. मार्चपासून महाविद्यालये पूर्णपणे उघडतील, असे स्ंकेत मिळत आहे.
-------------
कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नाही. गत १० महिन्यांपासून आश्रमशाळा, वसतिगृहे बंद आहेत. आता आयुक्तांच्या आदेशानुसार १०४ वसतिगृहांत १३ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाणार आहे.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’अमरावती
-------------------
असे होतील वसतिगृहात प्रवेश
प्रकल्पाचे नाव वसतिगृहांची संख्या वसतिगृहांची क्षमता
धारणी १८ २९३०
पांढरकवडा १९ २३४५
पुसद ११ १०२५
अकोला १६ १६६५
किनवट १५ १२२५
कळमनुरी ११ १२५०
औरंगाबाद १४ २७७५
------------------