बांधकाम विभागाला मृत्यूची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 05:00 AM2021-09-13T05:00:00+5:302021-09-13T05:00:57+5:30

बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ किमी आहे. या अंतरावर हजारो खड्डे आहेत. विशेष म्हणजे, माहुली चोर ते शिवणी मार्गावर मधोमध दोन फुटांचे खोल खड्डे आहे. या मार्गाने खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी अमरावतीत येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने या मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य न दाखविले नाही. यंदाही भलेमोठे खड्डे ‘जैसे थे’ आहेत. या मार्गाने चारचाकी चालकांनाही मणके सांभाळूनच प्रवास करावा लागत आहे.

Waiting for the construction department to die | बांधकाम विभागाला मृत्यूची प्रतीक्षा

बांधकाम विभागाला मृत्यूची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा ते यवतमाळ राज्य मार्ग कमालीचा खड्डेमय झाला असून मोठे भगदाड पडलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. या मार्गावर प्रवाशांना मरयातना व अपघाताची मालिका सुरूच आहे.
बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ किमी आहे. या अंतरावर हजारो खड्डे आहेत. विशेष म्हणजे, माहुली चोर ते शिवणी मार्गावर मधोमध दोन फुटांचे खोल खड्डे आहे. या मार्गाने खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी अमरावतीत येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने या मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य न दाखविले नाही. यंदाही भलेमोठे खड्डे ‘जैसे थे’ आहेत. या मार्गाने चारचाकी चालकांनाही मणके सांभाळूनच प्रवास करावा लागत आहे.

खड्डे भरणार केव्हा? 
नवीन रस्त्याचे स्वप्न सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता दाखवित असले तरी अद्याप निधी मिळालेला नाही. किमान मोठे खड्डे डांबराने भरण्याचे सौजन्यही दाखविले गेले नाही. दुसरीकडे नेर उपविभाग हद्दीत शिवणी सीमा ते यवतमाळपर्यंत रस्ता चकाचक आहे.  अमरावती जिल्हा सीमेत जवळा फाटापर्यंत डागडुजी बडनेरा उपविभाग का करीत नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

डागडुजीचा निधी कुठे? 
दरवर्षी रस्त्यावरील खड्डे भरणे, बाजूचे गवत कापणे, नाल्या काढणे याकरिता निधी मिळते. मात्र, यवतमाळ मार्गावर हे अनुदान मिळाले नसल्याचे कारण पुढे केले जाते. खड्ड्यात रस्ता की रस्तात खड्डे, अशी गंभीर अवस्था बडनेरा ते  शिवणीपर्यंत झाली आहे. ग्रामस्थ रस्त्याच्या दुरवस्थेने कमालीचे चिडून आहेत.

अभियंते बिनधास्त
यवतमाळ मार्गावर खड्ड्यातून रस्ता शोधावा लागतो. तब्बल दोन वर्षांपासून ना रस्ता दुरुस्ती, ना डांबरीकरण झाले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात होऊन लोकांच्या मरणाची वाट तर बघत नाही, असा सवाल माहुली चोर, धानोरा गुरव, सावंगा, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापूरचे नागरिक करीत आहेत.

Web Title: Waiting for the construction department to die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.