शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात डिसेंबरमध्येच पाण्यासाठी भटकंती, अकोला जिल्ह्यात ४० टँकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:16 IST

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता व-हाडात जाणवायला लागला आहे. दोन मोठे अन् मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित ४५२ प्रकल्पांमध्ये सरासरी ४३ टक्केच साठा शिल्लक आहे.

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता व-हाडात जाणवायला लागला आहे. दोन मोठे अन् मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित ४५२ प्रकल्पांमध्ये सरासरी ४३ टक्केच साठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात ४० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात विभागात जलसंकट भीषण होण्याची स्थिती ओढावणार आहे.विभागात बुलडाणा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ७४ टक्केच पाऊस झाला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत केवळ ३६ दिवस पाऊस पडला. त्याचे परिणाम आता जाणवायला लागले आहे. अकोला जिल्ह्यात ३७, बुलडाणा ३७, वाशिम २७, अमरावती ४५, तर यवतमाळ जिल्ह्यात फक्त ३४ दिवसच पाऊस पडला. या अपुºया पावसामुळे खरिपाचा हंगाम बाधित झाला. परतीच्या पावसामुळे जमिनीची थोडीफार आर्द्रता वाढली. त्यामुळे रबीचे क्षेत्र वाढले असले तरी जमिनीतील पाण्यात मात्र वाढ झाली नाही.याउलट सिंचन विहिरींची पातळी खोल गेली. भूजल सर्वेक्षण विभागानुसार, अमरावती विभागातील भूजलस्तर सरासरी दोन मीटरपेक्षा अधिक खालावला असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची भीषण समस्या उद्भवणार आहे. विशेष म्हणजे, विभागातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कृती आराखडाच अद्याप जिल्ह्यांनी तयार केलेला नाही. विभागीय आयुक्तांनी याविषयी सर्व जिल्हा प्रशासनाला दोन वेळा पत्र दिले आहे. मात्र, अंमलबजावणी करणा-या यंत्रणेचीच अनास्था असल्यामुळे विभागात यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती बिकट रूप धारण करणार आहे.४५४ प्रकल्पांमध्ये ४३.९४ टक्केच साठाविभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यापैकी अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा ८५ टक्के व अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये सरासरीच्या ३६ टक्केच साठा आहे. मध्यम प्रकल्पात सपन ८० टक्के, पूर्णा ८७ व सायखेडा वगळता उर्वरित २० मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४० टक्केच साठा आहे. विभागात एकूण ४५२ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३१ टक्केच साठा असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचे सावट आहे.जलशिवारच्या कामांचा आराखड्यास खोडाविभागात २०१५-१६ मध्ये १३९६ व २०१६-१७ मध्ये ९९७ अशा एकूण २३९७ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यात आलीत. या गावांतील जलस्तर उंचावल्याचे प्रशासनाचे म्हणणे असल्याने सर्व जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्याला विलंब होत आहे. मात्र, जानेवारीपासून आराखड्याच्या अंमलबजावणीचा दुसरा टप्पा सुरू होत असतानाही आराखडेच नसल्यामुळे विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी सर्व जिल्ह्यांना पत्र दिले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी