शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
2
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
3
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
4
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
5
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
6
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
7
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
8
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
9
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
10
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
11
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
13
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
14
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
15
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
16
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
17
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
18
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
19
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
20
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
Daily Top 2Weekly Top 5

३८ लाख लिटरने वाढणार वडाळी तलावाचा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:24 IST

ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावातीन १२ हजार ६०० चौरस मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचे ‘साथी हात बढाना’ । सामूहिक प्रयत्न, लोकसहभागातून जलजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावातीन १२ हजार ६०० चौरस मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. यामुळे किमान ३७ लाख ८० हजार लिटरने जलसाठा वाढणार आहे. शासनाचा कुठलाही निधी न वापरता जलजागृतीमधून आयुक्तांनी ही किमया साधली.वडाळीला गतवैभव प्राप्त व्हावे, याकामी आयुक्त निपाणे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दोन दिवस सामूहिक श्रमदान ही कल्पना साकारली. याला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. बघता बघता श्रमदानाची ही लोकचळवळ बनली व फक्त दहा दिवसांत १ हजार ७ ट्रक गाळ तलावातून काढण्यात आला. यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, महापौर सुनील नरवणे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक संघटना, डॉक्टर मंडळी आदी या लोकचळवळीत हिरीरीने सहभाग नोंदविला. राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी, जवानदेखील यामध्ये सहभागी झाले. आयुक्तांच्या आवाहनावरून महापालिका कंत्राटदार असोसिएशन, क्रेडाई, एमआयडीसी असोसिएशन, महानेट, नीलेश चौरसिया, विजय खंडेलवार, रूपचंद खंडेलवाल आदींनी जेसीबी, ट्रक उपलब्ध करून दिले. शहरातील दोन हजारांवर नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी झालेत.महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाच्या घरी शोषखड्डा व रेन वॉटर हार्वेस्टिंग असले पाहिजे, यासाठी आयुक्त आग्रही आहेत. सर्वप्रथम त्यांनीच स्वत:च्या शासकीय निवासस्थानी ही यंत्रणा उभारली. सद्यास्थितीत महापालिकेच्या २३ अधिकारी व २२४ कर्मचाऱ्यांकडे जलपुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. याशिवाय महापालिकेची आठ कार्यालये, उद्याने, महापालिकेची मैदाने, रस्त्यांच्या कडेला, कंत्राटदारांमार्फत, महापालिका क्षेत्रात क्रेर्डामार्फत सदनिका, महापालिकेच्या शाळा, दवाखाने व सर्व आरओ प्लांट आदी ८०० हून अधिक ठिकाणी पाण्याचे पुनर्भरण होणार आहे.विशेष म्हणजे, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह सर्वच अधिकाºयांनीदेखील या कामासाठी पुढाकार घेतला.असा वाढणार जलस्तरदहा दिवसांत १३ जेसीबीच्या साहाय्याने १२,६०० चौरस मीटर जागेतून ३७८० घनमीटर म्हणजेच ४०,६७३ घनफूट गाळ काढण्यात आला व हा गाळ २५ ट्रकच्या साहाय्याने नेण्यात आला. १००७ ट्रक गाळ फक्त दहा दिवसांत काढण्यात आला. यामुळे ३७,८०,००० लिटर पाणीसाठा वाढण्याची अपेक्षा आहे. तलावाच्या दोन किमी परिसरातील पाणीपातळी वाढणार आहे. महापालिकेचा निधी खर्च न करता लोकसहभागातून हे साध्य झाल्याचे आयुक्त संजय निपाणे म्हणाले.सन १९४२ मध्ये वडाळी तलावाची निर्मितीब्रिटिश काळात सन १९४२ मध्ये या तलावाची निर्मिती अमरावती व बडनेराच्या जलापूर्तीसाठी करण्यात आली. वडाळीचे पाणीसंरक्षण क्षेत्र ११ चौरस किमी व पाणीसाठा आठ चौरस किमी आहे. त्यावेळी तलावाची खोली ही ३० फूट होती. १९७४ मध्ये तलावाचे सौदर्यीकरण करण्यात आले. यामध्ये गार्डन बोटिंग, परदेशी व देशी पक्ष्यांसाठी विसावा केंद्र, टॉय ट्रेन आदींची निर्मिती करण्यात आल्याने वडाळी तलाव शहराचे आकर्षणाचे केंद्र बनले. १९९४ पासून अमरावती शहरास मजीप्रामार्फत ऊर्ध्व वर्धा धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्याने शहराचा महत्त्वाचा जलस्रोत असलेला वडाळी तलाव दुर्लक्षित झाला होता.

टॅग्स :Waterपाणी