आता मतदानाची पडताळणी शक्य

By Admin | Updated: September 13, 2014 23:32 IST2014-09-13T23:32:41+5:302014-09-13T23:32:41+5:30

विधानसभा निवडणुकीत अमरावती व अचलपूर मतदारसंघातील ५४८ मतदान केंद्रांवर ‘व्हीव्हीपॅट’चा प्रयोग पहिल्यांदाच केला जाणार आहे. बॅलेट मशिननंतर आता व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफीकेशन पेपर,

Voting verification is possible now | आता मतदानाची पडताळणी शक्य

आता मतदानाची पडताळणी शक्य

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : अमरावती, अचलपूरमध्ये ‘व्हीव्हीपॅट’चा उपयोग
अमरावती /अचलपूर : विधानसभा निवडणुकीत अमरावती व अचलपूर मतदारसंघातील ५४८ मतदान केंद्रांवर ‘व्हीव्हीपॅट’चा प्रयोग पहिल्यांदाच केला जाणार आहे. बॅलेट मशिननंतर आता व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफीकेशन पेपर, आॅडिट ट्रेल) हे नवीन मतदान यंत्र आले असून या यंत्राद्वारे मतदान केल्यास मतदान नेमके कुणाला गेले, हे दिसू शकेल, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
शिक्के मारण्यापासून बटण दाबण्यापर्यंत असलेली मतदान प्रक्रिया राबविणाऱ्या निवडणूक आयोगाने यावेळी पुन्हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत मतदारांची विश्वासार्हता वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्ह्यातील अमरावती व अचलपूर या दोन मतदार संघांमध्ये या यंत्राचा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. $$्रिमतदान प्रक्रिया होणार पारदर्शक
तशी तयारी प्रशासनाने चालविली आहे. अर्थातच बटण दाबले. पण, मतदान झाले नाही. बटण वरचे दाबले आणि खालच्या उमेदवाराला मतदान झाले, आस प्रकार आता पूर्णत: टळू शकेल. मतदारालाही आपण योग्य उमेदवारालाच मतदान केल्याची खात्री पटेल. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील मतदारांमध्ये हे यंत्र औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
मनुष्यबळ वाढणार
हे यंत्र वापरल्या जाणाऱ्या मतदान केंद्रांवर पूर्वी पेक्षा थोडी अधिक जागा लागणार आहे. तर हे यंत्र राबविण्यासाठी एका व्यक्तिचे अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे. मशिन ने आण करण्याची काळजी सुध्दा तेवढीच घ्यावी लागेल. अचलपूर, मतदार संघातील २९० व अमरावती मतदार संघातील २५८ अशा एकूण ५०८ मतदान केंद्रावर या मशिनचा वापर होणार आहे. आवश्यकतेनुसार काही अतिरिक्त मशिन्स देखील ठेवण्यात येणार आहेत.
त्यासाठी निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मतदान केंद्रांवर अतिरिक्त यंत्रांची व्यवस्था केली जाईल. विदर्भातील सहा विधानसभा मतदार संंघात व्हीव्हीपॅटचा उपयोग केला जाणार असून यामध्ये फक्त अमरावती जिल्ह्यातील दोन मतदार संघात हे यंत्र वापरले जाणार आहे.

Web Title: Voting verification is possible now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.