मतदारांना होणार मतदान केल्याची खात्री

By Admin | Updated: August 20, 2014 23:16 IST2014-08-20T23:16:48+5:302014-08-20T23:16:48+5:30

मतदान केल्यानंतर उमेदवाराचे नाव, त्याचा क्रमांक, चिन्ह अशी माहिती असलेली एक प्रत त्वरित प्रिंट होेईल. ती पाहून मतदाराला मतदान झाल्याची खात्री पटणार आहे. आगामी विधानसभेच्या

Voters will be sure to vote | मतदारांना होणार मतदान केल्याची खात्री

मतदारांना होणार मतदान केल्याची खात्री

अमरावती : मतदान केल्यानंतर उमेदवाराचे नाव, त्याचा क्रमांक, चिन्ह अशी माहिती असलेली एक प्रत त्वरित प्रिंट होेईल. ती पाहून मतदाराला मतदान झाल्याची खात्री पटणार आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात हा प्रयोग केला जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान झाल्यानंतर कोणत्या उमेदवाराला मतदान झाले याबाबत शंका राहत होती. मात्र अशा शंकाचे निराकरण करण्यासाठी आयोगाने व्हीव्हीपॅट प्रणाली व्हेरीफायबल वोटर पेपर आॅडील ट्रेल कार्यान्वित केली आहे. यात ईन्हीएम यंत्राला एक प्रिंटर जोडले जाते.
मतदाराने मतदानासाठी बटन दाबल्यानंतर प्रिंटरवर एक स्लीप प्रिंन्ट होऊन येते. त्याव्दारे मतदाराला आपण केलेले मतदान हे ठरवून दिलेल्या उमेदवारालाच मत मिळाल्याची खात्री पटेल, मात्र ही स्लीप मतदाराला मिळणार नाही, फक्त पाहता येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली.
मात्र व्हीव्हीपॅट प्रक्रिया राबविण्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे. याबाबत अद्यापपर्यंत कुठलेही आदेश निवडणूक विभागाने दिले नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे प्रक्रियेची अंमलबजावणी होईल नाही हे सांगता येत नाही.

Web Title: Voters will be sure to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.