मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: October 16, 2016 00:11 IST2016-10-16T00:11:02+5:302016-10-16T00:11:02+5:30
जिल्ह्यात जानेवारी ते मे २०१७ दरम्यान मुदत संपणाऱ्या २८ ग्रामपंचायतींच्या रिक्त ५२ सदस्यपदांसाठी...

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
५२ सदस्यपदासाठी पोटनिवडणूक : १६ नोव्हेंबरला अंतिम यादी
अमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते मे २०१७ दरम्यान मुदत संपणाऱ्या २८ ग्रामपंचायतींच्या रिक्त ५२ सदस्यपदांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यात १० आॅक्टोबरपर्यंत अनर्हता, राजीनामा व मयत या कारणांमुळे रिक्त असणाऱ्या व जानेवारी ते मे २०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी व सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विधानसभेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार याद्यानुसार विभाजन करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. प्रारूप मतदार याद्यांवर ७ नोव्हेंबरपर्यंत स्थानिक मतदारांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये लेखनिकाद्वारा चुका झाल्या असल्यास त्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असतानाही ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये मतदारांची नावे वगळली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावेत, असे निर्देश आयोगाचे सहायक आयुक्त के.कृष्णमूर्ती यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
असा आहे मतदार यादीचा कार्यक्रम
प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध - २५ आॅक्टोबर
हरकती व सूचना दाखल करणे - ७ नोव्हेंबरपर्यंत
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
- १६ नोव्हेंबर