१७ सप्टेंबरपर्यंतच करता येणार मतदार नोंदणी
By Admin | Updated: September 13, 2014 23:33 IST2014-09-13T23:33:52+5:302014-09-13T23:33:52+5:30
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांना १७ सप्टेंबर पर्र्यंतच

१७ सप्टेंबरपर्यंतच करता येणार मतदार नोंदणी
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
अमरावती : .विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांना १७ सप्टेंबर पर्र्यंतच मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दोन मतदारसंघ राखीव आहेत. यामध्ये दर्यापूर हा मतदार संघ अनुसुचित जातीसाठी आणि मेळघाट मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आठ मतदारसंघात एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान जिल्हयात २१ लाख ५० हजार ७९१ मतदार होते. त्यानंतर ३० जून पर्यंतच्या पूनर्रिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार यादीत मतदारांची नावे समाविष्ट मतदार व ३१ जुलै रोजी पर्यंत मतदार नोदणी केलेल्या मतदार नोंदणी पर्यंत सध्या जिल्हयातील मतदारांची संख्या ही २२ लाख ६ हजार ३८८ एवढी असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २० सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी प्राप्त अर्जाची छानणी होणार असून १ आक्टोंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार असून १५ आॅक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूकदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.