सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी मोहीम
By Admin | Updated: October 16, 2015 00:45 IST2015-10-16T00:45:28+5:302015-10-16T00:45:28+5:30
विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्ययावत केले जाणार असून राज्य निवडणूक आयोग त्याच मतदार याद्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी वापरणार आहे.

सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी मोहीम
अमरावती : विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्ययावत केले जाणार असून राज्य निवडणूक आयोग त्याच मतदार याद्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी वापरणार आहे. आॅक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ अखेर मुदत संपणाऱ्या महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीचा समावेश आहे. त्यासाठी मतदार नाव नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली असून ती ७ नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे सर्व पात्र नागरिक यामध्ये मतदार म्हणून आपली नावे नोंदवू शकतात. तसेच नाव पत्यातील बदल किंवा मृत व्यक्तीचे अथवा दुबार नावे वगळता येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदानापासून कुणीही वंचित राहू नये या उद्देशाने मतदार जागृती मोहीमही हाती घेतली आहे.