मतदार याद्या शुध्दीकरण, प्रमाणिकरण मोहीम

By Admin | Updated: March 18, 2015 00:26 IST2015-03-18T00:26:10+5:302015-03-18T00:26:10+5:30

मतदार यादीतील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी १२ एप्रील ते ३१ जुलै या कालावधीत मतदार यादी अद्यावतीकरण शुध्दीकरण कार्यक्रम निवडणूक..

Voter lists purification, authentication campaign | मतदार याद्या शुध्दीकरण, प्रमाणिकरण मोहीम

मतदार याद्या शुध्दीकरण, प्रमाणिकरण मोहीम

अमरावती : मतदार यादीतील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी १२ एप्रील ते ३१ जुलै या कालावधीत मतदार यादी अद्यावतीकरण शुध्दीकरण कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला असून या मोहीमेची अंमलबजावणी जिल्हात जिल्हा प्रशासना तर्फे सुरू होत असल्याची माहीती निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर,उपविभागीय अधिकारी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित पत्रपरिषदेला संबोधित करतांना बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले या मोहीमेच्या पहिल्या टप्यात जिल्हयात राष्ट्रीय मतदार याद्याचे शुध्दीकरण केले जाणार आहे.या दरम्यान मतदार यादीतील दुबार नाव नोंदणी, नावातील चुका दुरूस्त करणे, छायाचित्र नलकीचे असल्यास त्यात सुधारणा करणे, मय्यतांची नावे वगळणे, पत्ता दुरूस्त करणे अशा दुरूस्त्या केल्या जाणार आहेत. यासोबतच मतदान ओळखपत्राला आधारकार्ड क्रमांक जोडण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे. त्यांनी आॅनलाईन अथवा तहसीलमध्ये जावून आधारकार्ड लिकींग करावेत किंवा मोबाईल वरून एसएमव्दारे आपला आधार क्र. नोंदविता येणार असल्याचे प्रविण ठाकरे यांनी सांगीतले.तसेच या मोहीमेची माहिती देण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी , बी एल ओ हजर राहणार आहेत.जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर दर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष शिबीर घेणार आहेत ही मोहीम प्रत्येक महिन्यामध्ये राबविण्यात येणार आहे. ही सुविधा जवळच्या ई महासेवा केंद्र, मतदार मदत केंद्र, नागरी सेवा केंद्रात सुरु केली जाणार आहे. यादीतील दूबार नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ सादर करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव, वय पत्ता, फोटो यामध्ये चूका असतील त्यांनी फॉर्म क्र.८ संबंधीत तहसीलदारांकडे भरुन द्यावा त्याच बरोबर नाव वगळणे व दूरुस्तीसाठी आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ओळखपत्रासोबत आधार लिंक करण्यासाठी संबंधित ठिकाणी अर्ज घेवून मतदार ओळपत्राची आणी आधार कार्डची झेराक्स प्रत आणून दिल्यास मतदारांचे आधार लिंक केले जाईल.

Web Title: Voter lists purification, authentication campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.