‘कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:29+5:302021-03-07T04:12:29+5:30

वरुड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामवासीयांनी युवकांना संधी दिली. ग्रामवासीयांना अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाचा त्रास सहन करावा लागतो. ती ...

‘Volunteerism will not be tolerated’ | ‘कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही’

‘कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही’

वरुड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामवासीयांनी युवकांना संधी दिली. ग्रामवासीयांना अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाचा त्रास सहन करावा लागतो. ती यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा गावस्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आला.

मांगरूळी पेठ ग्रामपंचायत सदस्यांची बैठक सरपंच राजेंद्र घोरमाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला गावातील शासकीय कर्मचारी उपस्थित होते. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच राजेंद्र घोरमाडे यांनी केले. याप्रसंगी कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिला. यावेळी माजी सरपंच पांडुरंग घोरमाडे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सारंग काळमेघ, ज्ञानेश्वर खटके, उपसरपंच प्रकाश ब्राम्हणे, सदस्य विलास बांबल, रोहिणी काळमेघ, संगीता खटके, राजेश डवरे, मंगला खुरद, देवकी बाविस्कर, सविता ब्राम्हणे तसेच ग्रामसचिव शेख उपस्थित होते.

Web Title: ‘Volunteerism will not be tolerated’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.