व्हीएमव्ही परिसरात दुसऱ्यांदा दिसला बिबट; वनविभागाचे ‘सर्च’ अभियान
By Admin | Updated: November 18, 2014 22:45 IST2014-11-18T22:45:51+5:302014-11-18T22:45:51+5:30
कठोरा नाक्याजवळील व्हीएमव्ही परिसरात सोमवारी रात्री ११.३० वाजता दरम्यान पुन्हा बिबट आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागानेही परिसर पिंजून काढला

व्हीएमव्ही परिसरात दुसऱ्यांदा दिसला बिबट; वनविभागाचे ‘सर्च’ अभियान
अमरावती : कठोरा नाक्याजवळील व्हीएमव्ही परिसरात सोमवारी रात्री ११.३० वाजता दरम्यान पुन्हा बिबट आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागानेही परिसर पिंजून काढला असून अद्यापपर्यंत या परिसरात बिबट आढळल्याचे कोणतेही ठोस पुरावे हाती लागले नाहीत.
कठोरा नाक्याजवळील रहिवासी जहीर खान हे भाजीविक्रेता आहेत. ते रात्रीच्या वेळी याच भागातील पाण्याच्या टाकी परिसरात चौकीदारी करतात. सोमवारी रात्री ११.३० वाजता सुमारास जहीर खान व त्यांचा आसेगाव पूर्णा येथील रहिवासी मित्र सोबत होते. दरम्यान जहीर खान हा पाण्याच्या टाकीमागील परिसरात शौचास गेला होता. त्यावेळी पाण्याच्या टाकी लगतच्या परिसरातच त्यांना बिबट आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब जहीर खान याने त्यांच्या मित्राला सांगितली. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून व्ही.एम.व्ही. परिसरात बिबट आढळल्याची माहिती दिली. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास वन विभागाच्या शिकारी प्रतिबंधक पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डब्ल्यू. जी. शेख, वन कर्मचारी पी. टी. वानखडे, अमोल गावनेर , फिरोज खान, सतीश उमक व अमित शिंदे यांचे पथक व्हीएमव्ही परिसरात पोहाचले.