विश्वेश्वरैया यांची प्रेरणा सदैव जागृती देणारी
By Admin | Updated: September 16, 2015 00:09 IST2015-09-16T00:09:37+5:302015-09-16T00:09:37+5:30
अभियंत्याचे दैवत मोश्रगुंडम विश्र्वेश्र्वरैया यांची प्रेरणा सदैव जागृत राहण्यासाठी दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी जगभर साजरा होणारा जन्मदिवस म्हणजे अभियंता दिन मंगळवारी उत्साहात पार पडला.

विश्वेश्वरैया यांची प्रेरणा सदैव जागृती देणारी
अभियंता दिन : जिल्हा परिषदेत संघटनेचा उपक्रम
अमरावती : अभियंत्याचे दैवत मोश्रगुंडम विश्र्वेश्र्वरैया यांची प्रेरणा सदैव जागृत राहण्यासाठी दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी जगभर साजरा होणारा जन्मदिवस म्हणजे अभियंता दिन मंगळवारी उत्साहात पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सि.ही. तुंगे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता भा.शा. वावरे, प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ही.आर. बनगीनवार, अधीक्षक अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सी.बी. पाटील, जीवन प्राधिकरणच्या प्रभारी अधीक्षक अभियंता श्र्वेता बॅनर्जी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शरद तायडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पोटफोडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी भारतरत्न मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरैया यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किरण गित्ते व उपस्थितांना मागदर्शदर्शन केले. प्रास्ताविक पी.जी. भागवत यांनी, तर सूत्रसंचाालन एम. डी. गावंडे, लोखंडे आदींनी केले.