जिल्हाधिकाऱ्यांकडून कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:32+5:302021-04-11T04:12:32+5:30

अमरावती : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोना ...

Visit to the office of the Workers Welfare Board by the Collector | जिल्हाधिकाऱ्यांकडून कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाला भेट

जिल्हाधिकाऱ्यांकडून कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाला भेट

अमरावती : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. मंडळाकडून आता विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप, ऑनलाईन नोंदणी आदी कामे होत आहेत. मास्कचा वापर करणाऱ्यांनाच प्रवेश द्यावा. सामाजिक अंतर राखले जाईल, याची दक्षता घ्यावी. सॅनिटायझर, ऑक्सिमीटर व टेंम्परेचर गनचा वापर व्हावा. स्त्री व पुरुष कामगारांसाठी स्वतंत्र रांगा असाव्यात. सामाजिक अंतर राखण्यासाठी परिसरात वर्तुळे आखली आहेत. त्यांचा रांगेसाठी वापर व्हावा. विविध कल्याणकारी योजनांचे फलक ठळकपणे लावावेत. सुरक्षा कीट वाटप जेथे सुरू आहे, तेथे संबंधितांचे नाव, पत्ता व वाटपाची वेळ असा फलक दर्शनी भागात लावावा. सुरक्षा संच व अत्यावश्यक संच हे कार्यालयानजीकच्या अंतरावर व्हावे. जिल्ह्यातील सेतू कार्यालय किंवा सीएससी सेंटर, संगणक केंद्रधारकांनी बांधकाम मजुरांना ऑनलाईन कामकाजासाठी विहित शुल्क आकारावे. अधिकाधिक कामगार बांधवांची नोंदणी व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले. यावेळी कामगार उपायुक्त अनिल कुटे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Visit to the office of the Workers Welfare Board by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.