शहरातील स्‍वॅब टेस्‍टींग सेंटरला मनपा आयुक्‍तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:09+5:302021-02-23T04:20:09+5:30

अमरावती : महापालिका क्षेत्रात नव्याने सुरू केलेल्या सेंटरला महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी सोमवारी भेट दिली. या सेंटरमुळे तपासणीची ...

Visit of Municipal Commissioner to Swab Testing Center in the city | शहरातील स्‍वॅब टेस्‍टींग सेंटरला मनपा आयुक्‍तांची भेट

शहरातील स्‍वॅब टेस्‍टींग सेंटरला मनपा आयुक्‍तांची भेट

अमरावती : महापालिका क्षेत्रात नव्याने सुरू केलेल्या सेंटरला महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी सोमवारी भेट दिली. या सेंटरमुळे तपासणीची प्रक्रिया गतिमान होऊन नागरिकांना फायदा होत आहे. या केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या व्‍यक्‍तींना योग्‍य मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्‍यांनी दिल्‍या.

नागपुरी गेट येथील महापालिकेची शाळा, बाजार समिती जुना कॉटन मार्केट, आयसोलेशन दवाखाना (नवाथे)येथे सुरू करण्यात आलेल्या स्वॅब सेंटरला आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आल्या आहेत. पॉझिटिव्‍ह रिपोर्ट लवकर मिळाल्‍यामुळे संबंधित रुग्‍णाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळेल, असे आयुक्तांनी सांगितले.

महानगरपालिका क्षेत्रातील बाधित रुग्‍णांचे रहिवासी विभागात तयार करण्‍यात आलेल्‍या कंटेन्‍मेंट झोन किंवा हॉटस्‍पॉट क्षेत्रात शहरी आरोग्‍य केंद्रामार्फत करण्‍यात येणाऱ्या सर्वेक्षणांतर्गत आढळून येणारे एस.ए.आर.आय./आय.एल.आय. रुग्‍णांची कोरोना चाचणी करणे अपेक्षित आहे. याकरिता नागपुरी गेट, नेहरू मैदान, आयसोलेशन दवाखाना या तीन ठिकाणी स्‍वॅब सेंटर कार्यान्वित आहे. अँटीजेन चाचणी नकारात्‍मक आल्‍यास आणि रुग्‍णास लक्षणे असल्‍यास आर.टी.-पी.सी.आर. करणे अपेक्षित असल्याचे आयुक्त म्हणाले. यावेळी डॉ.फिरोज खान, डॉ.देवेंद्र गुल्‍हाणे उपस्थित होते.

बॉक्स

अँटिजेन निगेटिव्ह आल्यास आरटी-पीसीआर अनिवार्य

ज्‍या रुग्‍णांची अँटिजेन टेस्‍ट पॉझिटिव्‍ह येईल. त्‍या व्‍यक्‍तीला असलेल्‍या लक्षणांनुसार कोरोना केअर सेंटर, कोरोना हेल्‍थ सेंटर कोव्‍हीड हॉस्‍पिटलमध्‍ये संदर्भीय करण्‍यात येईल. चाचणी निगेटिव्ह आल्यास अशा रुग्णांनी आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी सांगितले. रुग्णांचे कॉन्‍टॅक्‍ट ट्रेसिंग व इतर प्रतिबंधात्‍मक कार्यवाही करण्‍यात येत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Visit of Municipal Commissioner to Swab Testing Center in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.