मला रोज भेट, फोन लावत जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:19+5:302021-09-24T04:14:19+5:30
अमरावती : मला रोज भेट, फोन लावत जा, असा तगादा लावत पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करण्यात ...

मला रोज भेट, फोन लावत जा!
अमरावती : मला रोज भेट, फोन लावत जा, असा तगादा लावत पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ती महिला जेवडनगर भागातील द्वारकानाथनगरातून कामाला जात असताना नितीन तायडे (४०, रा. दस्तुरनगर) याने तिचा विनयभंग केला.
तिने आरडाओरड केली असता, तिचे आई-वडीलदेखील तेथे आले. त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तक्रारीनुसार, पीडितेचे आरोपीशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर अन्य व्यक्तीशी तिचा विवाह झाला. मात्र, पतीशी पटत नसल्याने ती सहा-सात वर्षांपासून मुलासह आईकडे राहण्यास आली. दोन वर्षांपूर्वी पीडितेला आरोपी पुन्हा भेटला. लग्नाअगोदरचे प्रेमसंबंध असल्याने तू मला रोज भेटत जा, फोन लावत जा, असा तगादा त्याने लावला. नकार दिला असता, त्याने धमकी दिली. याबाबत यापूर्वीदेखील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर नितीन तायडे थांबला नाही. २१ सप्टेंबर रोजी त्याने पाठलाग करून विनयभंग केला. दुपारी ४ च्या सुमारास त्याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४ ड, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली.